Thursday, June 25, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 25, 2026
in सोलापूर
0
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या  सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिईओ जैन यांचे तत्परतेमुळे सर्व कामांना गती

अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पालकमंत्री यांचे मानले आभार

पंढरपूर – जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आषाढी यात्रा कालावधीत ग्रामपंचायतींना साडेचार कोटी रूपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली. ग्रामपंचायतींच्या अनुदानात १ कोटी रूपयांची वाढ करण्यात आली आहे.
वारकरी यांना देण्यात येणारे विविध कामांना मंजुरी आजच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली.
   जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आज पंढरपूर येथे विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य हे होते. या सभेस उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला बाल कल्याण समितीचे सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप  उपस्थित होते.

   पालखी मार्गावरील सांगोला, माढा व बार्शी, मंगळवेढा व उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातून येणार्‍या मार्गावरील ग्रामपंचायतींना वाढीव अनुदान देण्याची मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी १ कोटी रूपयांची वाढ करण्यात आले असल्याचे सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. या पुर्वी ८१ ग्रामपंचायतींना 3 कोटी 50 लोन रूपये अनुदान देणेत येत होते. या मध्ये १ कोटी रूपये वाढ करण्यात आली आहे. आणखी १० ग्रामपंचायतींचा पालखी मार्गावरील ग्रामपंचायती मध्ये समावेश करणेत आला आहे. ग्रामपंचायत विभागाच्या अंतर्गत वारकरी स्वागत कमान व वारकरी यांना पायांना आराम फुटमसाजर च्या कामांना मंजुरी देणेत आली. मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र (जर्मन हॅंगर), वारकरी यांच्या साठी शौचालय सुविधा व पालखी मार्गावरील स्वच्छता, स्नानगृह, पालखी तळांवर जोडणारे रस्ते, पिण्याचे पाण्याचे टॅंकर सुविधा, वारकरी यांचे साठी औषधे खरेदी, मोबाईल चार्जिंग स्टेशन या कामांनी एकमताने मंजुरी देणेत आली.

विधान परिषदेचे आमदार म्हणून राजेंद्र राऊत यांच्या निवडी बद्दल जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार व सदस्यांनी एकमताने अभिनंदन केले.

वारकरी यांचे सुविधांसाठी पुणे, सातारा, सोलापूर यांचे सह तिन्ही जिल्ह्यातील विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया व सुक्षम नियोजन करून कामांना गती दिल्या बद्दल जि प सदस्य पृथ्वीराज माने यांनी अभिनंदन केले.

…..

Previous Post

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

June 25, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या  सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

June 25, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

June 25, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

‘त्या’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

June 25, 2026
आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक