Thursday, June 25, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 25, 2026
in सोलापूर
0
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन केला  निषेध 

सोलापूर : खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूरातील पत्रकार संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निदर्शने करण्यात आली.

यावेळी पत्रकारांनी संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. पत्रकारांबाबत वापरण्यात आलेली भाषा ही अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय असल्याचे आंदोलकांनी म्हटले.

 

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/06/VID-20260625-WA0042.mp4

आंदोलनादरम्यान पत्रकार प्रतिनिधींनी सांगितले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकार हे जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत एका खासदाराने पत्रकारांविषयी अवमानकारक भाषा वापरणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे.

पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खासदार संजय दिना पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच भविष्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीं कडून पत्रकारांचा अवमान होणार नाही यासाठी कठोर भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या आंदोलनामुळे पत्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण असून, पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

…

Previous Post

‘त्या’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

June 25, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

‘त्या’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

June 25, 2026
आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक