Thursday, June 25, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘त्या’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 25, 2026
in सोलापूर
0
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री सहायता निधीतून  आर्थिक मदत 

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे १४ जून २०२६ रोजी पिकअप वाहन विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ८ जणांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एकूण ४० लाख रुपयांची मदत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वारसांना देण्यात आली.

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे पंढरपूर-सातारा मार्गावर पिकअप वाहन विहिरीत कोसळून अपघात झाला होता. या अपघातात इंदुबाई दशरथ बावचे (वय ६५), पूजा अमोल सातुरे (वय २३), पूजाव बालाजी बावचे (वय २७), अश्विनी संदीप बावचे (वय २७), संस्कार संदीप बावचे (वय १४), संस्कृती संदीप बावचे (वय १४), भारव अमोल सातुरे (वय ८) आणि समर्थ बालाजी बावचे (वय ६ महिने) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनुसार जिल्हाधिकारी यांनी आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये, अशी एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आली.

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

‘त्या’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

June 25, 2026
आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक