Wednesday, June 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 24, 2026
in सोलापूर
0
आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 आषाढी वारीत वारकर्‍यांना सर्व सोईसुविधा मिळणार .. मुख्यमंत्री

मुंबई : आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे. वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभर  पोहोचणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पालखी सोहळा प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंदाच्या वारीसाठी पालखी मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पालखी मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हॅंगर उभारण्यात आले असून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच इतर पालख्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हॅंगरची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे विभागाबाहेरील पालख्यांनाही सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री यांची नोडल पालकमंत्री व पुणे विभागीय आयुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. डीजे मुक्त वारी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वांशी चर्चा करून प्रयत्न करावेत. वारी सोहळा हा पारंपरिक पद्धतीनेच साजरा करावे.
लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा द्याव्यात. यंदाची वारी अधिक सुरक्षित, सुकर आणि संस्मरणीय करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या , महिलांसाठी रात्रीच्या मुक्कामाची विशेष सुरक्षितता घेतली आहे. वारकरी आणि भक्तांची काळजी घेत हा सोहळा चांगल्या प्रकारे साजरा करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी केले.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पालखी सोहळ्यात वारक-यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली आहे . पंढरपूर शहरात वारी सोहळ्यात आणि सोहळ्या नंतर स्वच्छतेचे सर्व नियोजन केले असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक