Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 21, 2026
in सोलापूर
0
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक
0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महसूल विभागाच्या ‘आशीर्वादा’ने औराद परिसरात अवैद्य मुरूम उपसा जोमात

तक्रार करूनही मंद्रूप तहसीलदारांचे “जाणीवपूर्वक ” दुर्लक्ष

खबर्‍यावर अद्याप कारवाई नाही

दक्षिण सोलापूर…
अवैद्य मुरूम उपसा करणाऱ्या निवृत्त तलाठ्यांच्या गाडीचा कारभार पाहणाऱ्या खबऱ्यामार्फत तहसीलदार नसल्याचे दिसताच बंकलगी शिवारात मंडल अधिकारी व तलाठी यांच्या वरदहस्ताने अवैद्य मुरूम उपसा जोमात सुरू आहे. मंद्रूप तहसीलदारांवर वाॅच ठेवून लाखो रूपये राॅयल्टी बुडविणार्‍या गाडीच्या खबर्‍यावर तहसीलदार कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय अवैद्य मुरूम उपसासंदर्भात माहीती देऊनही मंद्रूपचे तहसीलदार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते . त्यामुळे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मंद्रूपचे तहसीलदार, औराद मंडल अधिकारी व बकलगी, राजूर तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून औराद मंडलमधील राजूर व बंकलगी शिवारात निवृत्त तलाठ्याच्या दोन टिपरमधून मंडल अधिकाऱ्यांच्या संगनमताने हजारो ब्रास मुरूम उपसा होत असताना कारवाई होताना दिसून येत नाही . राजुरचे निवृत्त तलाठी बंकलगी शिवारातील राजुर व बंकलगी रस्त्यावरील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील मुरूम शासनाची रॉयल्टी न भरताच उपसा सुरू केला आहे . याबाबत औरादचे मंडल अधिकारी ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत असल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे रॉयल्टी बुडत आहे . याबाबत मंद्रूपच्या तहसीलदारांकडे वारंवार तक्रार करूनही मंडल अधिकारी व संबंधितांवर कारवाई होत नसल्यामुळे पर्यावरण प्रेमी मधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . मंद्रूप तहसीलदारांवर वाॅच ठेवणाऱ्या “मल्लू” नामक व्यक्तीकडून तहसीलदार गैरहजर असताना व सुट्ठीच्या दिवशी बंकलगी व राजूर रस्त्यावरील अनेक शेतातून दिवसाढवळ्या मुरूम उपसा करीत आहे. याबाबत मंद्रूपचे तहसीलदार विष्णू बुटे यांना खबरी व अवैद्य मुरूम उपसा बाबत कल्पना देऊनही संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांनाच शांत बसण्याचे तत्वज्ञान सांगण्यात येत आहे. शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी तहसीलदार नसल्यामुळे औराद मंडल अधिकाऱ्यांच्या ‘आशीर्वादा’ने अवैद्य मुरूम उपसा जोमात सुरू आहे . याबाबत तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळे मंद्रूपच्या तहसीलदारांच्या भूमिकेबाबत “संशय” व्यक्त करण्यात येत आहे . तहसीलदार व औराद मंडल अधिकाऱ्यांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडत आहे . गरीब व सामान्य शेतकरी शेतात बांध टाकताना व घरासाठी मुरूम उपसा केल्यानंतर मंडल अधिकार्‍या कडून दमदाटी करून रॉयल्टी भरण्यासाठी भाग पाडले जाते. मात्र सहा महिन्यापासून रॉयल्टी न भरता महसूल विभागातीलच एका निवृत्त तलाठ्याच्या गाड्यांमधून दिवसा अवैद्य मुरूम उपसा सुरू असतानाही मंडल अधिकारी व तहसीलदार बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

चौकट
…
जिल्हाधिखार्‍यांनी लक्ष देण्याची गरज
….
मंद्रूपच्या तहसीलदारांकडे बंकलगी परिसरातील अवैद्य मरूम उपसा संदर्भात वारंवार तक्रार देऊनही सुनावणीच्या नावाखाली त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे . सहा महिन्यापासून औराद मंडल परिसरातील अवैद्य मुरूम उपसा संदर्भात तक्रार करूनही तहसीलदार दुर्लक्ष करण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे . त्यामुळे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी समिती नेमून औराद शिवारातील मुरूम उपसा केलेल्या जमिनीचे मोजमाप करण्याची मागणी होत आहे. तसेच त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंडल अधिकारी व तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे .
…
त्या खबऱ्यावर कारवाई कधी
….
मंद्रूप मधील “मल्लू” नामक व्यक्ती निवृत्त तलाठ्याच्या गाड्यांचा कारभार पाहतो. या व्यक्तीमार्फत तहसीलदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते. तहसीलदार गैरहजर असल्याचे दिसताच बंकलगी शिवारातील अनेक शेतातून दररोज शेकडो ब्रास अवैद्य मुरूम उपसा करण्यात येत आहे . यामुळे शासनाची रॉयल्टी बुडत आहे . शिवाय शासकीय कामकाजातही हस्तक्षेप होत असताना तहसीलदार त्या खबऱ्यावर कारवाई का करत नाहीत ? तहसीलदारांकडून त्या खपऱ्यावर कारवाई कधी होणार ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
…
तहसीलमधील अधिकार्‍याशी संपर्क
…
तहसीलदारांवर “वाॅच” ठेवणार्‍या त्या व्यक्तीचे निवृत्त तलाठ्यामुळे मंद्रूप तहसील कार्यालयामधील अधिकार्‍याशी घनिष्ठ संबंध असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्या खबर्‍याकडून राॅयल्टी बुडवून दिवसा अवैद्य मुरूम उपसा होत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र यामुळे शाहनाचे नुकसान होत आहे. याला जबाबदार कौण ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

Next Post

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135081

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697