Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 25, 2026
in सोलापूर
0
स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी

 

 10 लाख 50 हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त

 

सोलापूर… सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनी दमदार कामगिरी करीत एसी संचाची चोरी करणारी टोळी पकडून त्यांच्याकडील २८ ए.सी. संचासह १० लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कामगिरीमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण  अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर  जिल्हयामध्ये मालाविषयी गुन्हयांची उकल करणेकामी व फरारी आरोपी जेरबंद करणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक   जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे  सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार मोहोळ पोलीस ठाणे येथील शिवाजी चौकातील ब्रिजखाली हजर असताना पथकातील पोलीस अंमलदार मोहन मनसावाले यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली . मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील तीन इसम चोरीचे केलव्हीनेटर कंपनीचे ए.सी. संचाची विक्री करण्याकरीता एकत्रित टाकळी सिकंदर येथील कारखाना वसाहत येथील दिपक साळुंके याचे घरासमोरील पत्राशेड समोर उभे असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली.

सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक  संजय जगताप यांना कळविले असता, त्यांनी सपोनि  वाघ यांना तात्काळ छापा कारवाई करणेबाबत आदेश दिले. सपोनि  वाघ व त्यांचे पथक मोहोळ शहरातील शिवाजी चौक येथील ब्रिज खालून बातमी प्रमाणे टाकळी सिकंदर येथील कारखाना वसाहत येथील दिपक सोळूंके याचे राहते घराजवळ आले असता, तेथे बातमी प्रमाणे 03 इसम उभे असलेले दिसले. त्यांचा सपोनि वाघ यांना बातमी प्रमाणे संशय आल्याने, त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ता विचारता ते उडवाउडवीचे उत्तरे देवू लागले, त्यांना सपोनि  वाघ यांनी विश्वासात घेवून पोलीस असल्याचे सांगून त्यांना त्यांचे नांव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नांवे 1) दिपक बाबुलाल सोळूंके, वय 47 वर्षे, रा. कारखाना कॉलनी, टाकळी सिकंदर, ता. मोहोळ जि. सोलापूर, 2) शहाजी पठाण गायकवाड, 23 वर्षे, रा. टाकळी सिकंदर ता. मोहोळ जि. सोलापूर, 3) प्रदिप रमेश चिंचकर, वय 26 वर्षे, रा. कारखाना कॉलनी, टाकळी सिकंदर, ता. मोहोळ जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर दिपक सोळूंके याचे घरासमोरील पत्राशेड मध्ये जावून पाहिले असता, मिळालेल्या बातमी प्रमाणे केलव्हीनेटर कंपनीचे 28 ए.सी. संच ठेवलेले दिसले . सदर ठिकाणी मिळून आलेल्या केलव्हीनेटर कंपनीचे ए.सी.बाबत  विचारपूस केले असता उडवाउडवीचे उत्तरे देवू लागली. त्यानंतर त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी  30 एप्रिल 2026 ते 01 मे 2026 दरम्यान अहमदनगर सुपा येथून कोची केरळ येथे मालवाहतूक पॅकबंद बॉडी असलेल्या आयशर वाहनाच्या चालक याचेबरोबर संगनमत करुन वाहनाचे पाठीमागील सिल तोडून सदर वाहनातील 28 केलव्हीनेटर कंपनीचे ए.सी. आणल्याचे सांगितले., त्याबाबत मोहोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी,  अपर पोलीस अधिक्षक  विजय कबाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोहेकॉ/ मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, अक्षय डोंगरे, ज्ञानेश्वर पाथरुट, जगदीश राठोड, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव, सतिष बुरकुल यांचे पथकाने कामगिरी बजावली आहे.

Previous Post

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

Next Post

निंबर्गीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
निंबर्गीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

निंबर्गीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135081

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697