Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सदैव तत्पर.. महादेव कोगनूरे यांची ग्वाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 26, 2026
in सोलापूर
0
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सदैव तत्पर.. महादेव कोगनूरे यांची ग्वाही
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एक लाख वह्या वाटप उपक्रमाचा प्रेरणादायी शुभारंभ

सोलापूर  :
समाजातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निःस्वार्थ भावनेने कार्यरत असलेल्या सागर सिमेंट लिमिटेड व एम. के. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एक लाख वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ विजापूर रोड येथील सागर सिमेंट कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प या संस्थांनी केला असून, त्याच परंपरेचा भाग म्हणून यंदाही एक लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वह्यांचे वाटप करून या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

जनसेवक महादेव कोगनुरे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, कि “गरीब विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील शिक्षणाची आस आणि त्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती पाहिल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. हे वही वाटप केवळ एक उपक्रम नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. माझ्या हातून जसे जमेल तसे हे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवण्याचा माझा निर्धार आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याच्या या प्रवासात माझा खारीचा वाटा कायम राहील.” पुढे बोलताना त्यांनी सागर सिमेंटच्या व्यवस्थापनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “समाजसेवेचे हे कार्य करण्याचे बळ मला सागर सिमेंटच्या माध्यमातून मिळते. कंपनीचे मार्केटिंग हेड राजेश सिंग  व कंपनी व्यवस्थापनाचा नेहमीच भक्कम पाठिंबा लाभला आहे. तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अधिकृत डीलर्स यांच्या सहकार्यामुळेच हे कार्य मोठ्या प्रमाणात राबविणे शक्य होत आहे. त्यांच्या विश्वास, पाठिंबा आणि आशीर्वादामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे भाग्य मला लाभले आहे. यासाठी मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे,” असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास सागर सिमेंटचे सर्व अधिकृत डीलर्स, समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

निंबर्गीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

Next Post

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135081

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697