Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 28, 2026
in सोलापूर
0
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वरूणराजा हजेरी लावल्याने कारहुणवी सण होणार उत्साहात

मंद्रूप..
सोमवारी २९ जून रोजी कारहुणवी सण असल्याने बळीराजा व पशूपालक पावसाच्या प्रतीक्षेत होते. एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र कारहुणवीच्या दोन दिवस आधी शनिवार आणि रविवार पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाले आहेत. त्यामुळे गाय व बैल सजावटीच्या साहीत्य खरेदीसाठी पशूपालकांची गर्दी दिसून येत आहे. कारहुणवी सणावर वरूणराजानी कृपा केल्यामुळे सण उत्साहात साजरा होणार आहे. कारहुणवी सणाच्या आदल्या दिवशी ‘खांदेमळणी’ हा अत्यंत महत्त्वाचा पारंपारिक विधी केला जातो. यासाठी पावसाने हजेरी लावल्यामुळे निसर्गाची कृपा दिसून येत आहे.

      या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना विश्रांती देतात . वर्षभर शेतात नांगरणी आणि ओझे वाहून बैलांचे खांदे कडक किंवा दुखणारे झालेले असतात. म्हणून आदल्या दिवशी पळसाच्या द्रोणात कढी आणि तेल घेऊन किंवा हळद-तेल लावून बैलांच्या खांद्याला हळुवारपणे मालिश केली जाते. यालाच ‘खांदेमळणी’ म्हणतात. या दिवशी बैलांना कोणत्याही प्रकारच्या शेतीच्या कामाला किंवा गाडीला जुंपले जात नाही. त्यांना पूर्ण आराम दिला जातो.बैलांना खिचडी आणि ज्वारीची कोवळी कणसे खाऊ घातली जातात.

शेतकरी घराची आणि गोठ्याची स्वच्छता करतात. बैलांच्या सजावटीचे साहित्य नवीन कासरे, बाशिंग, सुती दावे आणि शिंगांचे रंग खरेदी करून ठेवले जातात. आदल्या दिवशी बैलांचे कष्ट दूर करून त्यांना दुसऱ्या दिवशीच्या मुख्य सणासाठी सज्ज केले जाते. विशेष म्हणजे गाय व बैल स्वच्छ करण्यासाठी वरूणराजांनी हजेरी लावल्यामुळे पशूपालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

     ‘कारहुणवी’ हा शेतकरी आणि पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मंद्रूप, सोलापूर , अक्कलकोट आणि लगतच्या भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शेतीमध्ये वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैल व गायींची विशेष पूजा केली जाते. या दिवशी जनावरांना आंघोळ घालून त्यांचे शिंग रंगवले जातात .त्यांच्या अंगावर गोंड्यांचे बाशिंग, घुंगरू माळ, सुती/रेशमी दावे आणि झूल चढवून त्यांना आकर्षकपणे सजवले जाते. बैलांना पुरणपोळी, ज्वारीची कणसे आणि खिचडीचा नैवेद्य दिला जातो. सजवलेल्या बैलांची वाजत-गाजत आणि चांगभलंच्या जयघोषात गावात किंवा मंदिराभोवती मिरवणूक काढण्याची मोठी परंपरा आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

Next Post

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद - पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135066

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697