Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 28, 2026
in सोलापूर
0
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परस्परात समन्वय  उत्कृष्ट काम करावे

पंढरपूर:- आषाढी शुद्ध एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी, भाविक येतात. त्यांना मागील वर्षी प्रमाणे यावर्षीच्या आषाढी वारीतही दर्शन कमी वेळेत व सुलभपणे व्हावे यासाठी 10 जुलै 2026 पासून व्हीआयपी दर्शन बंद तसेच मंदिर परिसरात नो वेहिकल झोन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

आषाढी वारी 2026 अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली केबीपी कॉलेजच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आले होती, त्या प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, राष्ट्रीय महामार्ग चे प्रकल्प संचालक अभिजीत औटी, पोलिस उप विभागीय अधिकारी प्रशांत डगळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सह आयुक्त नगरपालिका आशिष लोकरे, अन्य धान्य पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, वीज वितरण चे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्या सह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, मागील वर्षी व्हीआयपी दर्शन बंद केल्याने वारकरी भाविक यांचा श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा वेळ किमान पाच ते सहा तास कमी झाला. तसेच मंदिर परिसरात नो व्हेकल झोन लागू केल्याने भाविकांना मंदिराला प्रदक्षिणा घालणं तसेच दर्शन घेऊन बाहेर पडणे सुलभ झाले होते. तसेच पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले होते. त्यामुळे यावर्षीही 10 जुलैपासून प्रशासनाने या दोन्ही बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/06/VID-20260628-WA0080.mp4

प्रशासनाने यावर्षीच्या वारीतही स्वच्छतेला सर्वोत्तम प्राधान्य द्यावे. नागरी भागात नगरपरिषद तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने वारीच्या अगोदर आठ दिवसापासून स्वच्छता मोहीम सुरू ठेवावी. पंढरपूर शहर, वाखरी पालखी तळ, 65 एकर आणि वाळवंट या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालये तसेच तात्पुरत्या शौचालयाची स्वच्छता व्यवस्थित करावी. महिला स्नानगृहे, हिरकणी कक्ष निर्माण करून त्यात आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच पंढरपूर शहर तसेच उपरोक्त सर्व ठिकाणी कोठेही कचरा पडणार नाही यासाठी पुरेसे साफसफाईचे कर्मचारी नियुक्त करावेत. शौचालयाच्या ठिकाणी चिखल होणार नाही या दृष्टीने मुरमीकरण, काँक्रिटीकरण करून घ्यावे. पाणी, वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरपरिषद पंढरपूर यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून शहरातील सर्व रस्त्यावरील खड्ड्यांचे दुरुस्ती करून घ्यावी तसेच नवीन मंजूर करण्यात आलेले रस्ते ही वेळेत पूर्ण करावेत. बांधकाम विभागाने शहरात आणखी रस्ते दुरुस्ती करण्यासाठी निधी आवश्यक असेल तर त्याबाबतची मागणी तात्काळ सादर करावी, पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पालखीच्या दोन्हीही मार्गावर प्रत्येक मुक्कामे विसावा ठिकाणी शौचालय अगोदर दोन दिवस उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषदेने सातारा व पुणे जिल्हा परिषदेची योग्य समन्वय ठेवावा यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.


पालखी मार्गाच्या बाजूंना रस्त्याच्या कडेला विहिरी असतील तर संबंधित विभागांनी तात्काळ त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात किमान सात ते आठ फूट उंचीचे मजबूत बॅरिकेटिंग करून घ्यावेत. चंद्रभागा नदीपात्रातील मोठे खड्डे जेसीबीच्या साह्याने तात्काळ भरून घ्यावेत. जलसंपदा विभागाने चंद्रभागा नदीत आषाढी एकादशीच्या अगोदर पाच सहा दिवस पाणी पोहोचेल या दृष्टीने धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र बैठक घ्यावी. वारकरी, भाविकांसाठी पालखी मार्ग पंढरपूर शहर पालखी तळ या ठिकाणी दिशादर्शक चिन्ह मोठ्या अक्षरात व दिसेल अशा उंच ठिकाणी बसवावेत. आरोग्य विभागाने तिन्ही जिल्ह्यांना औषधांचा मुबलक पुरवठा करावा. पालख्या सोमवेत आरोग्य पथके ठेवावीत. वीज वितरण कंपनीने वारीसाठी पुरुष मनुष्यबळ उपलब्ध ठेवून ते 24 तास कर्तव्यावर राहतील असे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री गोरे यांनी दिल्या.
..

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

Next Post

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार - पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135066

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697