Tuesday, June 30, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 30, 2026
in सोलापूर
0
३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”
0
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हालाखीच्या परीस्थितीत नोकरी करून परीवारासह जनसेवेला प्राधान्य देणारे शैलेश मुंजे

मंद्रूप :

कर्माची शिदोरी खांद्यावर, कर्तव्याची गाठ बांधली,

तीन दशकं सेवा करून, गावोगावी नाव ठेवले.”

मंद्रूपचे सुपुत्र आणि मुंजे कुटुंबाची “ओळख” असलेले श्री. शैलेश गंगाधर मुंजे उर्फ ‘अण्णा’ हे आज ३३ वर्षांच्या निरंतर शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.
“खुर्ची निवृत्त झाली, पण अण्णांची समाजसेवा कधीच निवृत्त होणार नाही.”
मंद्रूप येथील गरीब शेतकरी कुटुंबातील स्व. मळेप्पा मुंजे यांना गंगाधर, मल्लेशी आणि महादेव अशी तीन मुले व काशीबाई आणि चंद्रकला अशा दोन मुली. आजोबांच्या निधनानंतर आजी गौराबाई यांच्या संस्कारातून गंगाधर आणि त्यांच्या भावांना उच्च विचार मिळाले.
घरची परिस्थिती हालाखीची असल्याने शावरसिध्द आणि मळसिध्द या दोन भावांनी शिक्षण अर्धवट सोडले. मात्र शैलेश यांना शिक्षणाची गोडी असल्याने वडील गंगाधर , आई काशीबाई आणि दोन्ही काका मल्लेशी व महादेव यांनी एकत्र येऊन त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य केले. अण्णांनी डी.एड आणि कृषी पदविका पूर्ण केली. नोकरी मिळेपर्यंत वळसंग सूतगिरणी येथे शेती सुपरवायझर म्हणून हंगामी काम करून कुटुंबाला आधार दिला.
अखेर ३ जून १९९३ रोजी दक्षिण सोलापूर पंचायत समिती येथे ग्रामसेवक म्हणून रूजू झाले. त्यांच्या ग्रामसेवक नोकरीची सुरूवात बरूर गावापासून झाली. मुंजे कुटुंबासाठी नवा “टर्निंग पॉईंट” आला. यानंतर ३३ वर्षात त्यांनी दक्षिण सोलापूरमधील बरूर, नांदणी, बसवनगर, राजूर आणि अक्कलकोटमधील शेगाव, कलकर्जाळ, चिंचोळी(न.) या ७ गावांमध्ये काम केले. सेवेत असताना त्यांनी शासनाच्या नियमांना प्राधान्य दिले. त्यामुळे ३३ वर्षात एकही तक्रार अर्ज किंवा वरिष्ठांची नोटीस नाही. बदली झाल्यानंतरही “अण्णांनीच राहावे” असा आग्रह राजकीय नेते आणि नागरिकांनी धरला होता. त्यामुळेच २००१ साली तालुकास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार मिळाले.
१९९५-९६ मध्ये बरूर येथे ५६ झोपड्यांना आग लागली होती. त्या जळीतग्रस्तांना घरे मिळवून देण्यासाठी लोकप्रथीनीधींच्या सहकार्याने केलेल्या उत्कृष्ट कामामुळे राज्यात “बरूर पॅटर्न” आदर्श ठरला. हा त्यांच्या सेवेचा अविस्मरणीय ठेवा आहे. नोकरी लागल्यानंतरही अण्णांनी सोलापूरला न जाता मंद्रूपमध्येच राहणे पसंत केले. येथे राहून त्यांनी मुलगा शिक्षक, मुलगी डॉक्टर व मोठ्या मुलीचे पदवीपर्यंत शिक्षण होण्यासाठी सहकार्य केले. तसेच काकांच्या मुला-मुलींनाही शिक्षणासाठी मार्गदर्शन केले.
“सकाळी शेतात काम बघून जनसेवेचा प्रारंभ होत असे. त्यामुळे दोन्ही हातांनी समाज घडविण्याचे काम नेहमी झाला आहे .
लहानपणापासून शेतीची आवड असलेल्या अण्णा आजही सकाळी ७ ला शेतात असतात. कलिंगड, पपई, केळी, द्राक्षे, झेंडू, कांदा अशी पिके ते स्वतः लक्ष देऊन आधुनिक शेती करतात.
सेवानिवृत्तीनंतरही ते विविध सामाजिक आणि शासकीय कार्यात सहभागी राहणार आहेत.

“रिकामे खुर्ची, भरलेला इतिहास,
अण्णा, तुमची निष्कलंक सेवा आमचा अभिमान.”

आमच्या मुंजे परीवाराकडून त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा !

—__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

June 30, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

June 29, 2026
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

112597

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697