Monday, June 29, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 29, 2026
in सोलापूर
0
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 39;

0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सहा महिन्यांपासून नळजोडणी प्रलंबित 

मंद्रूप ..
येथील वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये राहणार्‍या डाॅ. शुभम डोणगावकर यांनी ग्रामपंचायत कर भरूनही नळ कनेक्शन मिळत नसल्याने ग्रामपंचायत कारभाराला कंटाळून आॅनलाईन तक्रार केली. आॅनलाईन तक्रारीची दखल घेऊन दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मंद्रूपमध्ये डाॅ. डोणगावकर यांच्या घरी भेट देऊन तक्रार निवारण केले.
डाॅ. शुभम डोणगावकर यांचे कुटुंब वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये वांगी रस्त्यालगत २५ वर्षांपासून वास्तव्यास आहे. यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायत नियमित कर भरून नळजोडणी घेतली होती. मात्र नवीन जलवाहीनीला नळ जोडणी देताना ग्रामपंचायत मधील ‘सदस्यांनी’ अंतर्गत विरोध करून कर्मचार्‍यांना परत पाठवायचे. सहा महिन्यां पासून ग्रामपंचायत प्रशासना कडून नळासाठी खड्डा मारल्यानंतर नळ जोडणी करताना असा प्रकार सुरू होता. वारंवार विनंती व विनवणी करूनही डाॅ. डोणगावकर यांना नळ जोडणी मिळत नव्हते.

       वास्तविक पाहता वर्षभरातील आठ ते दहा महिने ते बोअरचे पाणी वापरतात. मात्र ऊन्हाळ्यात बोअरमधील पाणी आटल्याने नळाच्या पाण्याचा वापर करतात. म्हणून रितसर नळजोडणी कर भरूनही ग्रामपंचायत कनेक्शन देत नसल्यामुळे डाॅ. डोणगावकर यांनी वैतागून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात आॅनलाईन तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन बीडीओ राऊत यांनी नळजोडणीस विरोध करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश मंद्रूप ग्रामपंचायतीला दिले. त्यामुळे तक्रारदार डाॅ. डोणगावकर यांनी बीडीओंचे आभार मानले आहे.

मंद्रूप ग्रामपंचायतकडून राजकारण
….
डाॅ. डोणगावकर हे भाजपाचे माजी सरपंच हेमंतकुमार स्वामी यांचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणूकीत भाजपाला मतदान केल्यामुळे नळजोडणी देताना ग्रामपंचायत कडून राजकारण करण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. नियमित कर भरणार्‍या नागरीकांना विनाकारण त्रास देणार्‍या मंद्रूप ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
…__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

June 29, 2026
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

June 26, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक