Tuesday, June 30, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दक्षिणच्या निवडणुकीत ‘दादा’ व ‘मालक’ यांची एंट्री

दिग्गजांकडून उमेदवारी अर्ज

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 20, 2026
in सोलापूर
0
दक्षिणच्या निवडणुकीत ‘दादा’ व ‘मालक’ यांची एंट्री
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिणमध्ये उमेदवारीची अनिश्चितता वाढली

जिल्हा परिषदेसाठी २३ तर पंचायत समितीसाठी ४६ अर्ज

सोलापूर..

अक्कलकोटमधील आमदार सचिन ( दादा ) कल्याणशेटी व शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शंकर ( मालक ) म्हेत्रे यांची एंट्री झाल्याने निवडणूकीत चुरस निर्माण झाली आहे. दक्षिणमधील बोरामणी, वळसंग व कुंभारी या मतदारसंघातील भाजप उमेदवार निश्चितीचा अधिकार आमदार कल्याणशेटी व शिवसेनेकडून शंकर म्हेत्रे यांना देण्यात आला आहे. त्यामुळे अक्कलकोटमधील निवडणूक टशन दक्षिणमध्ये असणार आहे.   जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून दक्षिणमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अर्ज भरण्यासाठी मंगळवारी इच्छुकांनी गर्दी केल्याचे दिसून आले . भाजपाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे भाजपासह इतर पक्षांनी एबी फाॅर्म वेटींगवर ठेवला आहे. मंगळवारी सुरेश हसापुरे भाजप, इंदुमती अलगोंडा पाटील भाजप , सोनाली कडते भाजप , धनशे अचलारे शिवसेना, उज्वला हविनाळे भाजप , सविता मेंडगुदले भाजप , मळसिध्द मुगळे भाजप , रामप्पा चिवडशेट्टी भाजप , संदिप टेळे भाजप, यांच्यासह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज बुधवार दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. जिल्हा परिषद गट …

बोरामणी .. ४, कुंभारी ८, वळसंग १ , हत्तूर ३, मंद्रूप ४ व भंडारकवठे ३ … एकूण …२३
पंचायत समिती गण …
कासेगाव १ , बोरामणी .. ४, कुंभारी ८, धोत्री १ , वळसंग ४, होटगी ४ , हत्तूर ७, औराद ३, मंद्रूप ४, कंदलगाव ३, भंडारकवठे १ व निंबर्गी ६ .. एकूण … ४६

  दक्षिणमध्ये कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी निश्चित नसल्यामुळे एका जागेसाठी पाच पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी २० जानेवारी रोजी एकूण ६९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढल्याचे दिसून येत आहे.

१६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सोमवारपासून इच्छुकांकडून अर्ज भरण्यात येत आहे. २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी असून २० जानेवारी रोजी अनेक दिग्गजांकडून उमेदवारी दाखल करण्यात आले. सर्वच पक्ष उमेदवारी निश्चित न करता अर्ज दाखल करण्यास सांगितले आहेत . त्यामुळे एका गटात एकाच पक्षाकडून चार ते पाच इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये व इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये, यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एबी फॉर्म शेवटच्या क्षणाला देणार असल्याचे सांगण्यात येत आहे . त्यामुळे कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.

Previous Post

सन्मान स्त्रीशक्तीचा , सोहळा आनंदाचा

Next Post

सोलापूरच्या या प्रभागासाठी ‘दादा’ देणार निधी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूरच्या या प्रभागासाठी ‘दादा’ देणार निधी

सोलापूरच्या या प्रभागासाठी 'दादा' देणार निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

June 30, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

June 29, 2026
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक