Tuesday, June 30, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूपचा आखाडा ‘ मुगळे ‘ नी मारला

आमदार सुभाष देशमुख गटाला धक्का

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 22, 2026
in सोलापूर
0
मंद्रूपचा आखाडा ‘ मुगळे ‘ नी मारला
0
SHARES
657
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार कल्याणशेटी गटाकडून उमेदवारी मिळविण्यात यशस्वी

सोलापूर…
दक्षिण तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मंद्रूप गणाच्या आखाड्यातील कुस्ती आमदार सचिन कल्याणशेटी यांच्या ताकदीमुळे मळसिध्द मुगळे यांनी पहिल्या डावातच मारली. त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व शक्ती पणाला लावल्यानंतरही मुगळे यांची उमेदवारी रद्द करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे देशमुख गटाला धक्का मानला जात आहे. मुगळे यांच्या उमेदवारीसाठी आमदार कल्याणशेटी यांनीही सर्व ताकद लावल्याने मुगळे यांची उमेदवारी शाबूत राहील्याचे सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत मळसिध्द मुगळे यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीवेळी भूमिपूत्राच्या मुद्यावरून रणशिंग फुंकला होता. त्यासाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणीही केली होती. मात्र आमदार देशमुख यांनी उमेदवारी मिळवून निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर देशमुख व मुगळे यांच्यामध्ये राजकीय विरोध वाढत गेला. त्यामुळे मुगळे यांना पंचायत समिती उमेदवारी मिळू नये, यासाठी आमदार देशमुख यांच्या गटातील अनेक पदाधिकार्‍यांनी प्रयत्न केला. त्यासाठी मंद्रूपचे हर्षवर्धन देशमुख यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. तसेच अखेरच्या क्षणी मंद्रूपचे तंटामुक्त अध्यक्ष रेवणसिध्द मेंडगुदले यांना भाजपकडून एबी फाॅर्म देऊन मुगळे यांना आव्हान देण्यात आले. अर्ज छाननीवेळी मेंडगुदले व मुगळे यांच्याकडून एकमेकांविषयी हरकत घेण्यात आली. अखेर मळसिध्द मुगळे यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारल्याने देशमुख गट नाराज झाल्याचे दिसुन आले.

Previous Post

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का

Next Post

दक्षिणमध्ये यांना पक्षाने सोडले वार्‍यावर

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
भाजपा उमेदवारांमध्ये ‘ सस्पेन्स ‘

दक्षिणमध्ये यांना पक्षाने सोडले वार्‍यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

June 29, 2026
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

June 26, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक