Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दक्षिणमध्ये यांना पक्षाने सोडले वार्‍यावर

आमदार सुभाष देशमुख यांची माने गटावर मात

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 23, 2026
in सोलापूर
0
भाजपा उमेदवारांमध्ये ‘ सस्पेन्स ‘
0
SHARES
989
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माजी आमदार दिलीप माने गटातील  भाजपची उमेदवारी रद्द

सोलापूर … 

दक्षिण तालुक्यामधील
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारी वाटपात भाजपाकडून गोंधळ निर्माण झाल्याने अधिकृत उमेदवार कोण ? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र अर्ज छाननीमध्ये भाजपाचे उमेदवार भाजपाच्याच उमेदवाराला हरकत घेतल्यामुळे माजी सभापती इंदुमती अलगोंडा, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हसापूरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उमेदवारी अपक्ष राहीली आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना वार्‍यावर सोडल्याची चर्चा सुरू आहे.

नऊ वर्षानंतर निवडणूका होत असल्याने उमेदवारी निवडताना पक्षश्रेष्ठींची मोठी दमछाक झाली. आमदार सुभाष देशमुख व माजी आमदार दिलीप माने यांच्या गटबाजीमुळे इच्छुकांना एकाच जागेसाठी दोन-दोन ए बी फॉर्म देण्यात आले. मात्र आमदार देशमुख यांनी माने गटावर विजय मिळवत माने गटातील उमेदवारी रद्द करून देशमुख गटातील इच्छुकांना उमेदवारी देऊन बाजी मारली आहे . त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे ते अपक्ष राहिले आहेत. ऐन निवडणूकीच्या दक्षिणमध्ये माने व देशमुख गट यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे . उमेदवारी वाटपामध्ये तालुक्याला त्याची प्रचिती आली. आमदार देशमुख यांनी त्यांच्या गटातील हत्तूर , मंद्रूप व भंडारकवठे गटासाठी उमेदवारी जाहीर केली . मात्र माजी आमदार माने यांनी त्यांच्या गटातील उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करून देशमुख गटाला शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हत्तुर, मंद्रूप व भंडारकवठे येथे दोन दोन एबी फॉर्म देण्यात आल्यामुळे उमेदवारी विषयी ‘सस्पेन्स’ निर्माण झाला होता . मात्र आमदार देशमुख यांनी सर्व ताकद पणाला लावून त्यांच्या गटातील उमेदवारांना उमेदवारी मिळवून देण्यात यशस्वी झाल्याने माने गटातील उमेदवारी अपक्ष राहिले आहेत. मात्र मंद्रूप पंचायत समिती गणातील मळसिद्ध मुगळे हे आमदार सचिन कल्याणशेट्टी गटातून उमेदवार राहिल्यामुळे देशमुख गटांना शह देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते.

दक्षिणमध्ये हत्तुर येथे इंदुमती अलगोंडा पाटील, सुरेश हसापुरे, शिवानंद पाटील यांच्यासह इतर पक्षातील अनिता माळगे शिवसेना, सिद्धाराम हेले भाजप , केदारलिंग विभूते भाजप, विद्युलता कोरे राष्र्टवादी, शालन चव्हाण भाजप, सविता मेंडगुदले भाजप, यशपाल वाडकर भाजप, बिपिन करजोळे भाजप, आप्पासाहेब मोटे भाजप, मोतीराम चव्हाण काॅंग्रेस, शिवराज कालदे भाजप, संतोष बरुरे शिवसेना, हर्षवर्धन देशमुख भाजप, रेवणसिद्ध मेंडगुदले भाजप, सारिका पाटील भाजप, व अभिलाषा कमळे भाजप यांना पक्षाने एबी फॉर्म न दिल्यामुळे सध्या अपक्ष म्हणून उमेदवारी राहिली आहे.

भाजप यांना पक्षाने एबी फॉर्म न दिल्यामुळे सध्या अपक्ष म्हणून उमेदवारी राहिली आहे. २७ जानेवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटचा दिवस असून या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Previous Post

मंद्रूपचा आखाडा ‘ मुगळे ‘ नी मारला

Next Post

सामाजिक कार्यामुळे श्रुती भोरगुंडे उमेदवारी मिळविण्यात ठरल्या सरस

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सामाजिक कार्यामुळे श्रुती भोरगुंडे उमेदवारी मिळविण्यात ठरल्या सरस

सामाजिक कार्यामुळे श्रुती भोरगुंडे उमेदवारी मिळविण्यात ठरल्या सरस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133841

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697