Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

हत्तूर जिल्हा परिषद गटात धनुष्यबाण चालणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 29, 2026
in सोलापूर
0
हत्तूर जिल्हा परिषद गटात धनुष्यबाण चालणार
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हत्तूर गटात शिवसेनेचा मतदार गाठीभेटींवर भर

हत्तूर .. जिल्हा परिषद गट हत्तूर व पंचायत समिती हत्तूर व औराद गणात शिवसेनेच्या उमेदवारांकडून वाड्यावस्त्या व गावातील मतदारांच्या भेटीवर भर देण्यात येत आहे. पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर अमर पाटील मातोश्री लक्ष्मीताई पाटील यांच्या विजयासाठी मतदारांना विनंती करीत आहेत. तर पंचायत समिती हत्तुर गणातून नरसप्पा दिंडोरे यांनी अहिरवाडीचे सरपंच म्हणून उत्कृष्ट काम केला आहे. तसेच औरादचे माजी सरपंच प्रमोद शिंदे यांनीही जनतेपर्यंत विकास पोहोचविला आहे . त्यामुळे दक्षिण पंचायत समितीवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी केला आहे .
हत्तूर जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या लक्ष्मीताई पाटील व भाजपाच्या डॉ. उज्वला हविनाळे यांच्यात काटे कि टक्कर लढत होत आहे. दोन्हीही तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हत्तूर जिल्हा परिषदा गटावरील पकड मजबूत करण्यासाठी अमर पाटील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन व तरुणांची फळी तयार करून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विकासकामे व धोरणात्मक निर्णयांची मतदारांना माहीती देऊन विकास करण्यासाठी संधी देण्याची विनंती करीत आहेत. पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य म्हणून मतदार संघातील विविध विकास कामांसाठी लाखो रुपयांचा निधी मिळवून दिला आहे . त्यामुळे हत्तूरची जनता शिवसेनेसोबत आहे. शिवसेना निवडून आल्यास हत्तूरचा कायापालट करू, असे सांगत अमर पाटील होम टू होम प्रचार करीत आहेत.
हत्तूर पंचायत समिती गणाचे उमेदवार नरसप्पा दिंडोरे व प्रमोद शिंदे हे सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला निवडून देण्याचे विनंती करीत आहेत . मतदारांमधूनही शिवसेनेच्या विजयासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे . तालुका अध्यक्ष योगीराज दिंडोरे व त्यांचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचा धनुष्यबाण तळागाळात पोहोचवण्यासाठी हाडाची काडी व रक्ताची पाणी करीत आहेत त्यामुळे हत्तूर जिल्हा परिषद गटात धनुष्यबाणच निवडून येणार अशी ग्वाही देण्यात येत आहे.

Previous Post

ताई, तुमचा विजय निश्चित

Next Post

दोन मिनिटे मौन पाळा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दोन मिनिटे मौन पाळा

दोन मिनिटे मौन पाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133921

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697