Wednesday, March 25, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मतदान तारखेत बदल

मतदान व निकाल दोन दिवस पुढे ढकलले

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 29, 2026
in सोलापूर
0
मतदान तारखेत बदल
0
SHARES
78
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान

9फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी

सोलापूर… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंजिल्हाचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.
राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
मा. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

Previous Post

दोन मिनिटे मौन पाळा

Next Post

सत्ताधार्‍यांना फुटबाॅलचा किक बसणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सत्ताधार्‍यांना फुटबाॅलचा किक बसणार

सत्ताधार्‍यांना फुटबाॅलचा किक बसणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनगर समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देणार … मुख्यमंत्री फडणवीस

तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचा पुढाकार

March 24, 2026
दक्षिणच्या सभापतीकडून नागरीकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य

दक्षिणच्या सभापतीकडून नागरीकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य

March 24, 2026
“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

March 19, 2026
‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

March 19, 2026
सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

March 19, 2026
तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

March 19, 2026
कारवाई होईपर्यंत उपोषणावर ठाम, २५ दिवसानंतरही प्रशासनाचे  आंदोलनाकडे दुर्लक्ष

अक्कलकोट गटशिक्षण अधिकारीवर कारवाई होईपर्यंत उपोषणावर सुरूच राहणार

March 18, 2026
९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

March 18, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक