Friday, June 26, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

हत्तूरच्या विकासासाठी भरभरून निधी देणार

आमदार सुभाष देशमुख यांची हत्तूरच्या जाहीरसभेत मतदारांना ग्वाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 31, 2026
in सोलापूर
0
हत्तूरच्या विकासासाठी भरभरून निधी देणार
0
SHARES
185
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जनसेवेला प्राधान्य देणार्‍या उज्वला हविनाळे यांना निवडून देण्याचे आवाहन

हत्तूर येथे आमदार देशमुख यांच्या हस्ते प्रचार शुभारंभ

हत्तूर…
बरूर येथील हविनाळे घराणे हे वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवा करीत आहेत. तालुका, जिल्ह्यासह परराज्यातील अनेक रूग्णांना जीवदान देण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे. डाॅ. चनगोंडा हविनाळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून या परीसरातील गावांच्या विकासास हातभार लावला आहे. त्यामुळे डाॅ. हविनाळे यांच्या स्नुषा उज्वला हविनाळे यांना समाजसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणे गरजेचे आहे. हविनाळे यांना निवडून दिल्यास हत्तूर मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्यामुळे हत्तूर गटामध्ये सत्ता परीवर्तन करून भाजपाला विकास करण्याची संधी देण्याचे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचाराचा शुभारंभ हत्तुर येथे सोमेश्वर व बनसिध्देश्वर देवाच्या चरणी नारळ वाढवून आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार देशमुख बोलत होते. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, आप्पासाहेब मोटे, डाॅ. चनगोंडा हविनाळे, डॉ. अनिल हविनाळे, राजेंद्र कुलकर्णी, बनसिद्ध पटेवडियर, प्रशांत सलगरे , विक्रांत हविनाळे, भाजपाच्या उमेदवार उज्वला हविनाळे, संदिप टेळे व पंचप्पा धनशेटी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेत हत्तुर जिल्हा परिषद गटाच्या भाजपाच्या उमेदवार उज्वला हविनाळे यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधत आपल्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा अनुभव मांडला. यावेळी जिल्ह्याच्या व तालुक्याच्या विकास, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणा साठी त्यांनी मांडलेली स्पष्ट व ठोस भूमिका उपस्थित नागरिकांच्या पसंतीस उतरली.
उज्वला हवीनाळे या उच्चशिक्षित डॉक्टर असून कोरोना महामारीसारख्या कठीण काळात त्यांनी समाजसेवेला प्राधान्य देत अनेक कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. यावेळी पंचायत समितीचे उमेदवार पंचप्पा धनशेट्टी यांनीही आपले मनोगत केला.

Previous Post

श्रृती गायगवळी यांची निंबर्गी गणात प्रचाराचा झंझावात

Next Post

भंडारकवठे येथील ग्रामदैवत महाशिवयोगी महासिध्द यात्रेस येणार्‍या भाविकांचे स्वागत !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post

भंडारकवठे येथील ग्रामदैवत महाशिवयोगी महासिध्द यात्रेस येणार्‍या भाविकांचे स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

June 25, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या  सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

June 25, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

June 25, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

‘त्या’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

June 25, 2026
आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक