Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे षडयंत्र

भाजपाचे उमेदवार मळसिध्द मुगळे यांची मतदारांना विनंती

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 1, 2026
in सोलापूर
0
विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे षडयंत्र
0
SHARES
212
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रूपच्या विकासासाठी कमळ फुलवा

मंद्रूप….
दक्षिण सोलापूरच्या विकासात आमदार सुभाष देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे . त्यांनी मंजूर केलेल्या निधीमधून शेकडो कोटींची विकास कामे झाली आहेत . त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात मंद्रूपच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. खड्यातील रस्त्यांना दर्जेदार रस्ते बनविण्याचे श्रेय आमदार बापू यांनाच जाते. भाजपच्या उमेदवारांच्या पराभवासाठी विरोधकांकडून षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे विरोधकांकडून विविध अफवा व भूलथापा पसरविण्यात येत आहेत . मंद्रूपच्या  मतदारांनी विरोधकांच्या भूलथापा व अफवांना बळी न पडता भाजपाच्या कमळ चिन्हाला मतदान करून विकासासाठी संधी देण्याची विनंती मंद्रूप पंचायत समिती गणाचे भाजपाचे उमेदवार मळसिद्ध मुगळे यांनी केला.
यावेळी मुगळे म्हणाले की , आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रूप पंचायत समिती गणात रस्ते, वीज, अंतर्गत गटारी , सभामंडप तसेच विविध विकासकामांसाठी कोट्यावधींचा निधी दिला आहे . त्यामुळे मंद्रूपमध्ये विकास दिसत आहे. मंद्रूपचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार बापूंचे प्रयत्न वाखणण्याजोगे आहे. तसेच मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय, ग्रामीण रूग्णालय, ट्रामा केअर सेंटर व सीतामाई तलावाला कॅनाॅलचे पाणी सोडवून मंद्रूपच्या शेतकर्‍यांच्या विकासासाठी हातभार लावला आहे. मात्र विरोधक आमदार देशमुख यांचे विकास मान्य करण्यास तयार नाहीत. भाजपाने मंजूर केलेल्या विविध विकास कामांना विरोध करण्याचे काम विरोधकांकडून झाला आहे . त्यामुळे मंद्रूपच्या तरुणांसह गावाचाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. सध्या भाजपच्या उमेदवारांना मतदारातून चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे विरोधकांकडून विविध अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. तसेच मतदारांना भूलथापा देऊन भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र मंद्रूपच्या सुज्ञ मतदारांनी विरोधकांच्या आमिषाला बळी न पडता विकासासाठी भाजपाला संधी देण्याची गरज आहे. दक्षिण सोलापूर पंचायत समितीवर भाजपचा कमळ फुलणार आहे. त्यामुळे विविध योजनांमधून निधी मिळवून मंद्रूपच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. तरुणांच्या रोजगारांसह मूलभूत गरजा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी मुगळे यांनी दिली.

Previous Post

काॅंग्रेसचे अनंत म्हेत्रे यांनी जाणून घेतल्या मतदारांच्या अडचणी

Next Post

“बाबां”ची उमेदवारी सत्ताधार्‍यांसाठी ठरतेय डोकेदुखी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“बाबां”ची उमेदवारी सत्ताधार्‍यांसाठी ठरतेय डोकेदुखी

"बाबां"ची उमेदवारी सत्ताधार्‍यांसाठी ठरतेय डोकेदुखी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133968

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697