Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“बाबां”ची उमेदवारी सत्ताधार्‍यांसाठी ठरतेय डोकेदुखी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 2, 2026
in सोलापूर
0
“बाबां”ची उमेदवारी सत्ताधार्‍यांसाठी ठरतेय डोकेदुखी
0
SHARES
366
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 यासीन मकानदार यांचा धडाक्यात प्रचार शुभारंभ

मंद्रूप …
मंद्रूप पंचायत समिती गणातून मंद्रूपमधील वाॅर्ड क्रमांक ४ चे ग्रामपंचायत सदस्य यासीन मकानदार यांना मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षातर्फे उमेदवारी मिळाली आहे. यासीन मकानदार यांनी २०२२ च्या ग्रामपंचायत निवडणूकीत सत्ताधार्‍यांच्या होमपीच असलेल्या चार नंबर वाॅर्डातून विजय मिळवून सत्ताधार्‍यांना धक्का दिला होता.
त्यानंतर आता पुन्हा पंचायत समिती गणातून सत्ताधार्‍यांविरोधात दंड थोपाटला असून त्यांच्या उमेदवारीमुळे सत्ताधार्‍यांच्या मतांची विभागणी होणार असल्यासे सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे यासीन ‘बाबा’ मकानदार सत्ताधार्‍यांना धक्का देऊन चमत्कार करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागली आहे.
यासीन मकानदार यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत आरके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांच्या पॅनलमधून विजय मिळविला. यापूर्वी त्यांनी प्रस्थापित व सत्ताधार्‍यां विरोधात अनेक वेळा लढत दिली होती. मात्र २०२२ च्या निवडणूकीत त्यांनी चमत्कारी विजय मिळविला होता. निवडून आल्यावर मकानदार नागरीकांच्या कल्याणासाठी मासिक बैठकीत सत्ताधार्‍यांना विरोध केला आहे. आठवडा बाजार लिलाव घोटाळा, माझी वसुंधरा निधी गैरवापर, करसंकलनातून करण्यात आलेल्या विकासकामे अथवा गावाच्या विकासास घातक ठरणार्‍या अनेक प्रस्तावांना विरोध केला आहे. शिवाय झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी मंद्रूप ग्रामपंचायतला भेट दिल्यावर ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराबद्दल तक्रार केली होती. त्यामुळे मकानदार म्हणजे सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी आहे. शिवाय वाॅर्ड क्रमांक ४ सत्ताधार्‍यांसाठी होमपीच असताना तेथील मतदानात घट होणार आहे. मकानदार यांनीही पंचायत समिती गणात प्रचार करताना मंद्रूपच्या मतदारांना टार्गेट मताधिक्य मिळविण्यासाठी जोर लावला आहे.
यासीन मकानदार यांनी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाकडून उमेदवारी मिळवून पक्षाचे पदाधिकारी व तरूणांच्या जल्लोषात उपस्थितीत प्रचार शुभारंभ केला. यावेळी प्रस्थापित व सत्ताधार्‍यांविरोधात लढाई असून नागरीकांच्या कल्याणासाठी सदैव रस्त्यावर उतरणार आहे. तसेच शेतकरी व नागरीक यांच्या समस्यांची जाणिव असल्याने मतदारांना निवडून देण्याची विनंती केली.
यावेळी माकपचे प्रदेश सचिव एम.एच. शेख, जिल्हा सचिव सुलेमान शेख, तालुकाध्यक्ष जावीद आवटे, शहरअध्यक्ष सिकंदर मकानदार, इक्बाल आवटे, मल्लिकार्जून कांबळे, फारूक शिकलगार आदी उपस्थित होते.

Previous Post

विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे षडयंत्र

Next Post

पत्नीच्या विजयासाठी एकाकी प्रचार करणारा अवलिया महमद शेख

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
‘भाईं’चा मंद्रूपच्या प्रस्थापितांना आव्हान

पत्नीच्या विजयासाठी एकाकी प्रचार करणारा अवलिया महमद शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133946

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697