Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पत्नीच्या विजयासाठी एकाकी प्रचार करणारा अवलिया महमद शेख

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 2, 2026
in सोलापूर
0
‘भाईं’चा मंद्रूपच्या प्रस्थापितांना आव्हान
0
SHARES
199
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महमद शेख यांची पत्नीसाठी एकाकी झुंज

मंद्रूप..
मंद्रूप जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे जिल्हा सचिव महमद शेख यांच्या पत्नी काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत . पत्नी सनाकौसर शेख यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते मतदारसंघात त्यांचा प्रचार करण्यापर्यंत महमद शेख यांची कसोटी पणाला लागलेली दिसून येते. पत्नीसाठी एकाकी प्रयत्न सुरू असतानाही न डगमगता काॅंग्रेसचे विचार जिवंत ठेवण्यासाठी महमद शेख प्रयत्न करीत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या उमेदवारी मागणीला चेष्टा समजणार्‍या मित्रांना पत्नीला उमेदवारी मिळावून दिल्यानंतर महमद यांच्या चिकाटी व पाठपुराव्याबद्दल कौतुक करण्यात येत आहे.
घरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना काॅंग्रेसचे जिल्हा सचिव व पक्षाच्या अडचणीच्या काळात पत्नीला उमेदवारी मिळवून देणे खरंच कौतुकास्पद आहे.   मंद्रूप जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण जाहीर झाल्यापासून महमद यांनी जिल्हा परिषद गटासाठी काॅंग्रेसकडून उमेदवारी मिळविणारच असा चंग बांधून त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केला. पक्षश्रेष्ठींकडे वारंवार पाठपुरावा करून कार्यकर्त्यांमध्ये प्रचार सुरू केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या बैठकीत दक्षिणमध्ये स्वतंत्र लढण्याची मागणी केली. इतकेच नव्हे, तर दक्षिणमध्ये काॅंग्रेसला पूरक वातावरण असल्याने खासदार प्रणितीताई शिंदे यांना स्वतंत्र लढण्यासाठी साद घातला. मंद्रूप जिल्हा परिषद गटासाठी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी पदाधिकाऱ्यां मार्फत पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन मंद्रूप जिल्हा परिषद गटातून त्यांच्या पत्नी सनाकौसर शेख यांना काॅंग्रेसकडून उमेदवारी मिळाली. सनाकौसर या प्रस्थापित व सत्ताधारी असणाऱ्या उमेदवारांविरोधात लढत देत आहेत . महमद हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकाळात त्यांना जिल्हा सचिव पद देण्यात आले. पक्षाच्या अडचणीच्या काळात अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश करून पक्षाला वार्‍यावर सोडले. मात्र महमद यांनी दक्षिण तालुक्यात काॅंग्रेस टिकवण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केला. त्यामुळे सातलिंग शटगार जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा त्यांना नवीन कार्यकारीणीत जिल्हा सचिव पदावर संधी देण्यात आली. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी काँग्रेसच्या विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला . तसेच वेगवेगळ्या निवडणुकातही प्रचार करून काँग्रेसचे विचार जिवंत ठेवण्यासाठी कार्य केले. पत्नी सनाकौसर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सुरुवातीपासूनच एकाकी झुंज देत परिवार व मित्रांच्या सहकार्याने मंद्रूप जिल्हा परिषद गटात प्रचार यंत्रणा राबवीत आहेत . मंद्रूप जिल्हा परिषद गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती यांच्याशी त्यांच्या पत्नीची लढत होत आहे . विरोधक सत्ताधारी व बलाढ्य असतानाही महमद न डगमगता जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात जाऊन पत्नीसाठी मतदान करण्याची विनंती करीत आहेत. सामान्य कुटुंबातील उमेदवार असल्यामुळे मतदारांच्या समस्या व अडचणीची जाणीव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अडचणी सोडवण्यासाठी व हाकेला धावून येणार्‍या पत्नी सनाकौसर यांना निवडून देण्याची साद घालत आहेत . पत्नीला उमेदवारी मिळवून देऊन जिल्हा परिषद गटातील विविध गावात जाऊन काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महमद हे जीवाचे रान करीत आहेत. सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ते मित्रांसोबत प्रचारासाठी फिरत आहेत. सामान्य कुटुंबातील तरुणांच्या पत्नीला मतदारांमधून किती प्रतिसाद मिळते? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. काॅंग्रेसचे पदाधिकारी व मित्र परीवारांच्या सहकार्याने प्रचार सुरू असल्याने दररोज ऊठून नवीन उमेदीने ते प्रचार करताना दिसून येतात. मंद्रूप जिल्हा परिषद गटात काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी पत्नीला उमेदवारी मिळवून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार्‍या महमद शेख यांचे कौतुक होत आहे.

Previous Post

“बाबां”ची उमेदवारी सत्ताधार्‍यांसाठी ठरतेय डोकेदुखी

Next Post

जावीद लिगेवान यांचे सत्ताधार्‍यांना आव्हान

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जावीद लिगेवान यांचे सत्ताधार्‍यांना आव्हान

जावीद लिगेवान यांचे सत्ताधार्‍यांना आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133966

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697