Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

भाजपा उमेदवारांनी शब्द पाळला

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 5, 2026
in सोलापूर
0
भाजपा उमेदवारांनी शब्द पाळला
0
SHARES
424
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मळसिध्द मुगळे यांनी प्रचारसभा घेतला नाही

अजितदादांना वाहीली अनोखी श्रध्दांजली

मंद्रूप..
प्रचार शुभारंभ करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची वार्ता समजताच भाजपाचे मंद्रूप पंचायत समितीचे उमेदवार मळसिध्द मुगळे यांनी मळसिध्द मंदिरात प्रचारसभा न घेण्याचा निर्धार केला होता. गुरूवारी रात्रीपासून प्रचार बंद झाला. मात्र या काळात मुगळे यांनी त्यांच्या विरोधात राष्र्टवादी काॅंग्रेस पक्षाचे उमेदवार असतानाही त्यांनी प्रचारसभा न घेण्याचा शब्द पाळला. त्यामुळे मंद्रूपमधील राजकारणातील सभ्यतेचे दर्शन दिसून आले.
दक्षिण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत सर्व गण व गटात प्रचारसभा झाले. मात्र मंद्रूप गणात भाजपाकडून प्रचारसभा घेण्यात आले नाही. राज्याच्या राजकारणातील ‘ डॅशिंग ‘ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातातील निधनामुळे राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. शिवाय राज्याच्या विकासातही अजितदादा पवार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत भाजपा उमेदवार मुगळे यांनी श्रध्दांजली म्हणून प्रचारसभा न घेता पदयात्रा व मतदारांच्या गाठीभेटीवर भर देणार असल्याचे सांगितले. प्रचार बंद होताना मुगळे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पदयात्रा काढून सर्व देवांच्या चरणी नारळ वाहीले. यावेळी पिर शेखसाहेब येथील दर्गामध्ये दर्शन घेऊन मंद्रूपच्या विकासासाठी भाजपाच्या उमेदवार सोनाली कडते व मळसिध्द मुगळे यांना निवडून देण्याची विनंती केली. यावेळी प्रशांत कडते, शिवपुत्र जोडमोटे, सुरेश टेळे, नागनाथ घाटे, शिवानंद लोभे, शिवानंद जोडमोटे, शिवराज कालदे, राहुल पुजारी, चिदानंद मुगळे, सिध्दलिंग म्हेत्रे, सिध्दाराम काळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

“मालकशाही” रोखण्यासाठी दक्षिणमध्ये दोन्ही देशमुख एकत्र

Next Post

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133966

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697