Tuesday, June 9, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांना मिळणार आवश्यक सुविधा … जिल्हाधिकारी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 15, 2026
in सोलापूर
0
पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांना मिळणार आवश्यक सुविधा … जिल्हाधिकारी
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आषाढी वारीची पूर्वतयारी 

पंढरपूर – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, उपलब्ध करून देण्याबरोबरच रस्ते दुरुस्ती, शौचालय सुविधा व स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.

आषाढी यात्रेच्या पुर्व तयारीच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे , उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, , जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधधिक्षक डॉ. सरडे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने, व्यवस्थापक प्रविणकुमार घम तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस म्हणाले, पालखी सोहळा आणि सर्व भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पालखी मार्गावरील रस्त्यांची वारीपूर्वी दुरूस्ती करावी. यासाठी सार्वजनीक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी आवश्यक तात्काळ पाहणी करुन रस्ते दुरुस्ती बाबतची कार्यवाही करावी. पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा याठिकाणी भाविकांना पुरेशा शौचालय सुविधा व मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे. स्वच्छतेसाठी अधिकचे मनुष्यबळ व आवश्यक यंत्रणाची उपलब्धतेबाबत नियोजन करावे. अन्न औषध प्रशानाने पालखी मार्गावरील तसेच शहरातील व परिसरातील खाद्य पदार्थांच्या दुकानांची तपासणी करावी. तसेच पदार्थांची तपासणी करुन तात्काळ अवहाल प्राप्तीसाठी फुड सेफ्टी ऑन व्हील या मोबाईल व्हॅनची संख्या वाढवण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच भेसळ व विषबाधा होऊ नये यासाठी जनजागृती करण्याचे नियोजन करावे.
तसेच सुरक्षेसाठी वाखरी, भक्ती सागर (65 एकर) , वाळवंट, दर्शन मंडप, दर्शन रांग, मंदीर व परिसर, प्रमुख रस्ते ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित करुन एकाच ठिकाणी ऑपरेटींग सिस्टीम करण्याबात नियोजन करावे. वारी कालावधीत खाजगी हॉस्पिटलचे दहा टक्के बेड रिकामे ठेवण्याबात आरोग्य विभागाने आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या.
_________________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

कुशल जैन सोलापूर झेडपीचे नवे सीईओ

Next Post

सीईओ कुशल जैन यांनी स्वीकारला पदभार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सीईओ कुशल जैन यांनी स्वीकारला पदभार

सीईओ कुशल जैन यांनी स्वीकारला पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

June 9, 2026
साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक