Tuesday, June 9, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

झेडपी सदस्यांना मिळाले कामकाजाचे प्रशिक्षण

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 16, 2026
in सोलापूर
0
झेडपी सदस्यांना मिळाले कामकाजाचे प्रशिक्षण
0
SHARES
119
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शाश्वत  विकासासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घ्यावा – उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

सोलापूर – शाश्वत विकास ध्येय विकासाच्या कृतीसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घ्यावा , असे आवाहन यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले .जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण विभागाच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे, जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर, यशदाचे उपसंचालक आनंद पुसावळे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, उपसंचालक वित्त रमेश लिदडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांचेसह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती व खातेप्रमुख हे प्रमुख उपस्थित होते.

प्रास्तविक व स्वागत उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केले. प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. या प्रशिक्षणासाठी कक्ष अधिकारी सचिन साळुंखे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, साप्रवि मधील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, १५ वा वित्त आयोगात ६० टक्के रक्कम पाणी व स्वच्छता व इतर ४० टक्के रक्कमेचे आराखड्यात नियोजन करा. स्वच्छतादूत म्हणून काम करा. प्लास्टिक हटवा. प्लास्टिक पुनर्वापर करा. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान प्रभावी राबवा. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शाश्वत विकास ध्येय आपण सर्वांनी स्वीकारलेले या संकल्पनाचे मतदारसंघनिहाय नियोजन करावे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या प्रत्येक मुद्द्यावर डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले तरी तसेच प्लास्टिक व्यवस्थापन यावर देखील मार्गदर्शन करून त्यांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याची आवाहन जिल्हा परिषद सदस्य यांना केले. सिईओ कुलदीप जंगम यांचे विनंतीनुसार या प्रशिक्षणाचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी १५ वा व १६ वा वित्त आयोगातील बंधित व अबाधित निधीच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती सदस्यांना द्यावी अशी मागणी केली. या प्रसंगी सभापती अमृता वाघे यांनी मनोगत व्यक्त केले. उपसंचालक आनंद पुसावळे यांनी सोप्या भाषेत जिल्हा परिषद व पंचायत समिती सभेच्या कामकाजाची माहिती दिली.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी व जिल्हा परिषद व पंचायत समिती रचनेबाबत माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे आदर्श नियोजन या विषयावर शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन करून सदस्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचेशी समन्वय साधून काम करावा. भांडणात वेळ घालवून विकास कामांवर परिणाम होऊ देऊ नका. अभ्यास करून अधिकारी यांचेशी चर्चा करा असे आवाहन केले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सीईओ कुशल जैन यांनी स्वीकारला पदभार

Next Post

विद्यापीठाच्या परीक्षावर होणार परीणाम

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विद्यापीठाच्या परीक्षावर होणार परीणाम

विद्यापीठाच्या परीक्षावर होणार परीणाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक