Tuesday, June 9, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विद्यापीठाच्या परीक्षावर होणार परीणाम

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 17, 2026
in सोलापूर
0
विद्यापीठाच्या परीक्षावर होणार परीणाम
0
SHARES
244
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२१ एप्रिलपासून महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर 

सोलापूर: सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्याबरोबरच राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारीही २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे यांनी दिली. यावेळी विद्यापीठ सिनेट सदस्य अजितकुमार संगवे, कोषाध्यक्ष राहुल कराडे, महेश सुरवसे, अनिल कळसकर, सुरेश वाघमारे आदी उपस्थित होते.

समन्वय समिती महाराष्ट्र यांच्यातर्फे ७ वेळा लक्षवेधी आंदोलन करूनही मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही. १५ महिन्यांत चर्चेसाठी वेळ दिला नाही. विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. प्रलंबित मागण्या निकाली न काढल्याने शिक्षकेतर कर्मचारी वर्गात असंतोष वाढला आहे. त्यामुळे नाइलाजाने बेमुदत संप करावा लागत आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील युनिट प्रमुखांनी आपले निवेदन संबंधित प्राचार्यांना द्यावे, असे आवाहन कॉलेज कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सध्या विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. शासनाच्या आडमुठे धोरणामुळे आम्हाला हा संप करावा लागत आहे.
या बेमुदत संपामुळे विद्यापीठाच्या परीक्षावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाने याची दखल घ्यावी.
——-

प्रमुख प्रलंबित मागण्या:

– १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेऐवजी जुनी पेन्शन लागू करा.

– चतुर्थश्रेणी कर्मचारी भरतीवरील बंदी उठवा. रिक्त पदे तातडीने भरा.

– १०:२०:३० आश्वासित प्रगती योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा.

– सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस उपचाराची सुविधा द्या.

– सेवानिवृत्तीचे वय ६० करा.

– कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांसाठी आयपीसी कलम ३५३ मध्ये दुरुस्ती करून कलम ३५३ अजामिनपात्र करा.

– नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करा.
__________________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

झेडपी सदस्यांना मिळाले कामकाजाचे प्रशिक्षण

Next Post

जिल्हा परिषद लिपिक वर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द … अविनाश गोडसे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जिल्हा परिषद लिपिक वर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द … अविनाश गोडसे

जिल्हा परिषद लिपिक वर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द ... अविनाश गोडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक