Tuesday, June 9, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूपच्या राजकारणात मनिष देशमुख यांची एंट्री

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 17, 2026
in सोलापूर
0
मंद्रूपच्या राजकारणात मनिष देशमुख यांची एंट्री
0
SHARES
241
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंद्रूप पोटनिवडणुकीत जनक्रांती पॅनलच्या उमेदवाराची बिनविरोध निवड
दक्षिण सोलापूर,..
मंद्रूप  येथील ग्रामपंचायत वार्ड क्रमांक २, इंदिरानगर येथील रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत जनक्रांती पॅनलच्या उमेदवार अंकीता उमाशंकर रावत यांनी श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनिष देशमुख यांच्या मध्यस्थीमुळे माघार घेतल्याने  सुनंदा सोमनिंग मुगळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. या विजयामुळे परिसरात राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून येणार आहे. मात्र पंचायत समिती सदस्य मळसिध्द मुगळे यांच्या विरोधात समीकरण यशस्वी झाल्याने मनिष देशमुख यांचे मंद्रूपच्या राजकारणात एंट्री झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आगामी काळात मुगळे यांच्या विरोधात अनेक राजकीय घडामोडी घडणार असल्याचे सांगण्यात येते.
या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोरे गटाकडून एकही उमेदवार उभा राहीला नाही. भाजपकडून एक उमेदवार उभा करण्यात आला होता. मात्र अर्ज छाननीदरम्यान त्याचा अर्ज बाद ठरला. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात केवळ भाजप पुरस्कृत जनक्रांती पॅनलचे उमेदवार उरले.
जनक्रांती पॅनलकडून राऊत आणि मुगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि  पॅनलमध्ये समन्वय साधण्यात आला. पक्षहित, संघटनशक्ती आणि विकासाला प्राधान्य देत अंकिता रावत उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे सुनंदा सोमलिंग मुगळे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
या संपूर्ण प्रक्रियेत मनीष देशमुख यांचे नेतृत्व आणि निर्णयक्षमता ठळकपणे दिसून आली. त्यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे पक्षाची संघटनशक्ती अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसले.
विजय घोषित होताच  भाजप पुरस्कृत जनक्रांती पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी हनुमंत कुलकर्णी , गौरीशंकर मेंडगुडले, निलेश
हेळकर, महेश मेंडगुदले , सिद्धाराम काळे , नितीन रणखांबे, बबलू पोतदार, अनिल जोडमोठे आदि उपस्थित होते.
पॅनल प्रमुख उमामाशंकर राऊत व रेवणसिद्ध मेंडगुदले म्हणाले की, “हा विजय जनतेचा आणि नेतृत्वावरच्या विश्वासाचा आहे. मनीष देशमुख यांच्या सक्षम मार्गदर्शनामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंद्रूपच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
….
बिनविरोध सदस्य मुगळे कोणत्या गटाचे?
….
वाॅर्ड क्रमांक दोन मधून  बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्या सुनंदा मुगळे यांचे पुत्र चिदानंद मुगळे यांनी आमदार सुभाष देशमुख व बाजार समिती संचालक मनीष देशमुख यांच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. पंचायत समीती सदस्य मळसिध्द मुगळे यांच्या विरोधात देशमुख गट काम करीत आहे. शिवाय देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांसह मुगळे यांनी सत्कार स्वीकारल्याने ते देशमुख गटाचे म्हणून सांगण्यात येत आहे.  दुसरीकडे सोशल मीडियावर पंचायत समिती सदस्य मळसिद मुगळे यांच्या समर्थकांकडून मळसिध्द मुगळे यांच्या प्रयत्नामुळेच सुनंदा मुगळे बिनविरोध निवडून आल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे बिनविरोध झालेल्या महिला ग्रामपंचायत सदस्य मुगळे कोणत्या गटाचे ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*
Previous Post

जिल्हा परिषद लिपिक वर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द … अविनाश गोडसे

Next Post

आषाढीतील वारकरी व पुरग्रस्तांची सेवा सदैव स्मरणात राहणार – सिईओ कुलदीप जंगम

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
आषाढीतील वारकरी व पुरग्रस्तांची सेवा सदैव स्मरणात राहणार – सिईओ कुलदीप जंगम

आषाढीतील वारकरी व पुरग्रस्तांची सेवा सदैव स्मरणात राहणार - सिईओ कुलदीप जंगम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक