Tuesday, June 9, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आषाढीतील वारकरी व पुरग्रस्तांची सेवा सदैव स्मरणात राहणार – सिईओ कुलदीप जंगम

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 17, 2026
in सोलापूर
0
आषाढीतील वारकरी व पुरग्रस्तांची सेवा सदैव स्मरणात राहणार – सिईओ कुलदीप जंगम
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नुतन सिईओ कुशल जैन यांचे स्वागत तर कुलदीप जंगम यांना निरोप

सोलापूर – जिल्ह्यात आषाढी यात्रेत वारकरी यांचेसाठी केलेली सेवा व पुरग्रस्तांसाठी केलेले काम सदैव स्मरणात राहिल असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले. सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निरोप समारंभ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा स्वागत समारंभाचे आयोजन करणेत आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचे हस्ते सिईओ जंगम व त्यांचे पत्नी डॉ. तेजस्वीनी जंगम यांचा सत्कार करून गणरायाची मुर्ती भेट दिली. तर नुतन सिईओ कुशल जैन यांचे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची मुर्ती देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भुजबळ प्रमुख उपस्थित होते.
सिईओ कुलदीप जंगम पुढे म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेत खुप काही कामे करता आली. आषाढी यात्रेतील अनुभव, पुरस्थिती असताना पुरग्रस्त गावात केलेली कामे चांगली स्मरणात राहतील. बाजूचे अनेक लोक एखाद्या व्यक्ती बाबत कानात सांगतात. त्यावर किती विश्वास ठेवायचा ते आपण ठरवायचे. अनुकंपा भरती, सेवा कर्मी पुरस्कार हा सर्वांचे प्रयत्नातून व एकजुटीने केलेले कामातून मिळालेला पुरस्कार आहे. काम करीत असताना पत्नीने दिलेली साथ मोलाची असल्याचे सिईओ कुलदीप जंगम यांनी बोलताना व्यक्त केले. डॉ. तेजस्विनी जंगम यांनी सिईओ जंगम यांचे कार्यकालात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली साथ दिली. जिल्हा परिषदेचे नाव राज्यात झाले. सोलापूर चे अनुभव आनंददायी असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, डाॅ. एस पी माने, लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, गणेश हुच्चे , संजय गौडगाव , मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जवंजाळ, शिक्षक संघटनेचे रणजित थिटे, संतोष निळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.
या प्रसंगी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे , जिल्हा परिषद कर्मचारी संघटना पतसंस्था क्र. १ चे डाॅ. एस पी माने, युनियन चे अध्यक्ष दयानंद परिचारक , जिल्हा परिषद कर्मचारी संघटना पतसंस्था क्र. १ चे गिरीष
जाधव, सुधाकर माने देशमुख, रणजित घोडके, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरूण क्षिरसागर, लेखा विभाग कर्मचारी संघटनेचे वतीने योगेश हब्बु, उमेश खंडागळे यांनी तर मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जवंजाळ तसेच प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने म. ज. मोरे, सरचिटणीस श्रीकांत दळवी यांनी संघटनेचे वतीने नुतन सिईओ कुशल जैन व पिंपरी चिचंवड महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांचा सत्कार केला.

…

सिईओ जंगम यांची बदली वेदनादायी- उपाध्यक्ष इंद्रजित पवार

…

सिईओ कुलदीप जंगम यांची झालेली बदली वेदनादायी आहे. त्यांचे समवेत नुकतीच कामास सुरूवात केली होती. त्यांनी विविध उपक्रम समजावून सांगितले. या मध्ये माझे वैयक्तीक नुकसान झाले आहे. असे मत उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी व्यक्त केले.

….

सिईओ जंगम यांचे पथदर्शी कामे पुढे चालू ठेवू – नुतन सिईओ कुशल जैन

…

सोलापूर जिल्हा भौगौलिक दृष्ट्या मोठा जिल्हा आहे. सिईओ कुलदीप यांनी राबविलेले पथदर्शी मार्गीने कामांची वाटचाल सुरू ठेवू असे मत नुतन सिईओ कुशल जैन यांनी व्यक्त केले.

…

कुलदीप जंगम देवमाणुस – अध्यक्ष दिपक वैद्य
…………………………………………
जिल्हा परिषदेत काम करीत असताना शांत , संयमी असलेले कुलदीप जंगम हे देवमाणुस आहेत. असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य यांनी व्यक्त केले. चांगला सिईओ म्हणून त्यांची कारकिर्द स्मरणात राहिल असेही अध्यक्ष वैद्य यांनी सांगितले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

मंद्रूपच्या राजकारणात मनिष देशमुख यांची एंट्री

Next Post

नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर नागेश बनला सहायक नगर रचनाकार अधिकारी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर नागेश बनला सहायक नगर रचनाकार अधिकारी

नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर नागेश बनला सहायक नगर रचनाकार अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक