Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 20, 2026
in सोलापूर
0
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ट्रान्सफार्मर चोरी करणारी टोळी गजाआड

गुन्हयांमधील 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा…
सातारा जिल्ह्यातील बोरगांव पोलीस ठाणे हददीत गेले दोन महिन्यापासून शेती पंपाच्या कॉपर वायर चोरी व डी.पी. (ट्रान्सफार्मर) चोरी च्या घटना वारंवार घडत असल्याने साताराचे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडुकर व पोलीस उपविभागीय अधीकारी
राजीव नवले यांनी स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व बोरगांव पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांना शेती पंपाच्या कॉपर वायर व डी.पी चोरीच्या गुन्हातील अज्ञात इसमाचा शोध घेवुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले , पोलीस उपनिरीक्षक एम.ई. पाटील
व बोरगाव डी. बी. पथक तसेच स्थानीक गुन्हे शाखेचे पथक यांनी चोरी झालेल्या घटनास्थळी वारंवार भेटी देवून सखोल तपास केला.

    गोपणीय वातमीची संपूर्ण माहीती तसेच सायबरच्या मदतीने तांत्रीक पध्दतीने विश्लेषण माहिती घेवून 1) हर्षद सुनिल जाधव, वय 23 वर्षे, रा. सासपडे ता.जि. सातारा, 2) स्वप्नील संजय मगर, वय 21 वर्षे, रा.ढोरोशी ता.पाटण जि.सातारा, 3) विकास वाल्मिक कदम, वय 23 वर्षे, रा.मरळोशी ता.पाटण जि.सातारा, 4) विवेक विजय लादे, वय 23 वर्षे, रा.सासपडे ता.जि.सातारा 5) शेखर चंद्रकांत सावंत रा. निवडे ता.पाटण जि.सातारा यांना सापळा लावून शिताफिने ताब्यात घेवून त्यांना अटक केला. काही महिन्यापासून नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी सागर चंद्रकांत मोरे रा. भुडकेवाडी, ता.पाटण जि.सातारा व त्याचे अन्य दोन ते तिन अनोळखी साथीदार असे सर्वानी संगनमत करून बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत 01 डी. पी (ट्रान्सफार्मर) व 04 ठिकाणी शेतीपंपाची कॉपर वायरची चोरी केली असल्याचे कबुली दिली. आरोपी सागर मोरे तसेच त्यांचे इतर साथीदार यांनी बोरगांव, कोरेगांव, सातारा तालुका, सातारा शहर, भुईंज, उंब्रज या पोलीस ठाणे हद्दीत एकुण 26 ठिकाणी कॉपर वावर व डी. पी. चोरी केले असल्याचे कबुली दिली. आरोपीत यांनी चोरी करताना गुन्हयात वापरलेली 01 पिकअप, 04 मोटारसायकल, 05 मोबाईल व चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच चोरी केलेला मुद्देमाल व रोख रक्कम अशी एकूण 26 गुन्हांमध्ये 20 लाख 22 हजार 482/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे,, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर , पोलीस उपविभागीय अधीकारी राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके बोरगांव पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपपनिरीक्षक एम.ई. पाटील, एस.एम. बसवंत, डी. बी. पथकातील पीएसआय प्रविण शिंदे, रफिक काझी, पोलीस हवालदार निलेश गायकवाड, दिपककुमार मांडवे, विजय म्हेत्रे, संजय खाडे, सुनील कर्ण, प्रविण नावडकर, रफिक शेख, नंदकुमार कचरे, प्रशांत चव्हाण, जगदीश कणसे, सुमीत साळुंखे, ज्ञानेश ढाणे, विशाल जाधव, समाधान जाधव, केतन जाधव यांनी केली आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

Next Post

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135096

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697