Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 17, 2026
in सोलापूर
0
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

१८  जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी ६१६ मतदार असून सोलापूर विधानपरिषदेचा ठरविणार आहेत. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रावर एकूण ६१५ मतदार(एक मतदार मयत) मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी सकाळी ८ वाजता नियोजन भवन, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक जिल्हा परिषद, एक महानगरपालिका व १७ नगरपरिषद/नगरपंचायत अशा एकूण १९ संस्था असून त्यातील मतदारसंख्या ५४४ आहे. याशिवाय ४९ नामनिर्देशित व २३ अध्यक्ष मिळून एकूण मतदारसंख्या ६१६ इतकी आहे.यामध्ये जिल्हा परिषद सदस्य ६८, पंचायत समिती सभापती ११, सोलापूर महानगरपालिका नगरसेवक १०२, स्वीकृत अथवा नामनिर्देशित सदस्य ९ , नगरपालिका आणि नगर पंचायतमधिल सदस्य ३७४, नामनिर्देशित ४० व नगर पंचायत अध्यक्ष १२ असे एकूण ६१६ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.

   निवडणुकीसाठी एकूण १५ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. अंतिमतः २ उमेदवार निवडणुकीत उभे राहिले आहेत.
जिल्ह्यात एकूण ६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. कुर्डूवाडी येथे ८०, उत्तर सोलापूर येथे १८८, दक्षिण सोलापूर येथे ८९, पंढरपूर येथे १००, मंगळवेढा येथे ६२ व अकलूज येथे ९७ मतदारांची व्यवस्था असून पुरुष व महिला मतदारांची संख्या प्रत्येकी ३०८ अशी आहे.मतदान केंद्रांवर तहसीलदार हे केंद्राध्यक्ष असतील. नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक व शिपाई यांची नेमणूक मतदान अधिकारी व कर्मचारी म्हणून करण्यात आली आहे.
मतदानासाठी मतदारांनी उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम अंकात लिहावा लागणार आहे. पहिली पसंती दर्शविण्यासाठी ‘१’ अंक लिहिणे बंधनकारक आहे. भारत निवडणूक आयोगाने पुरविलेला जांभळा स्केचपेन वापरणे आवश्यक आहे. अंक शब्दांत लिहिल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने नोंदवल्यास मतपत्रिका अवैध ठरेल.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

Next Post

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135104

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697