Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंडल अधिकार्‍याला लखपती होण्याचा मोह नडला,

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 13, 2026
in सोलापूर
0
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी पैशाची मागणी
0
SHARES
118
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंडल अधिकार्‍यावर एसीबीची कारवाई

लाचखोरीमुळे महसूल विभाग पुन्हा चर्चेत

सोलापूर : मुरूम ट्रक सोडून लखपती होण्याचा मोह एका मंडल अधिकार्‍याला चांगलाच नडला . जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक दंडात्मक कारवाई न करता सोडण्यासाठी तब्बल १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी विजयकुमार माने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागातील लाचखोरीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे .


तक्रारदाराचा मुरूम वाहतूक करणारा ट्रक महसूल विभागाने जप्त केला होता. हा ट्रक सोडण्यासाठी मंडल अधिकारी विजयकुमार माने यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती . तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली.
त्यानुसार एसीबीने सोमवारी दुपारी सोलापूर उत्तर तहसील कार्यालयात सापळा रचून तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना विजयकुमार माने यांना रंगेहात पकडले. सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे . महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी दिली आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

विठ्ठल दर्शनासाठी आता “नो वशिला” , “सगळ्यांसाठी एकच रांग, एकच नियम!” ,

Next Post

‘तांत्रिक कारण’ ठरणार औरादच्या “सर्कल”साठी डोकेदुखी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

'तांत्रिक कारण' ठरणार औरादच्या "सर्कल"साठी डोकेदुखी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133966

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697