Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विठ्ठल दर्शनासाठी आता “नो वशिला” , “सगळ्यांसाठी एकच रांग, एकच नियम!” ,

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 13, 2026
in सोलापूर
0
विठ्ठल दर्शनासाठी आता “नो वशिला” ,   “सगळ्यांसाठी एकच रांग, एकच नियम!”       ,
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दर्शनरांगेतूनच मिळणार दर्शन

प्रशासनाकडून व्हीआयपी कल्चरला पूर्णविराम

पंढरपूर :
१५ जुलैपासून पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नियम धाब्यावर बसवून कोणालाही व्हीआयपी दर्शन घडवून आणणाऱ्या संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्तिकयन एस. यांनी जारी केले आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापुढे मंदिरात “नो वशिला” म्हणजेच कोणत्याही प्रकारची शिफारस, व्हीआयपी पास किंवा विशेष प्रवेश बंद करण्यात आला आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सर्वसामान्य दर्शनरांगेतूनच जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. श्रीमंत-गरीब, मंत्री, आमदार , खासदार व सामान्य असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्याद्वारे २४ तास कडक देखरेख व विशेष भरारी पथकांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे .


गेल्या काही वर्षांपासून दर्शनासाठी “पास”, “शिफारस” आणि “स्पेशल एंट्री” यासाठी होणारी गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रांगेत तासन्तास उभ्या असणाऱ्या सामान्य भाविकांना आता दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने अलर्ट मोड घेतला आहे. नियम मोडणाऱ्या कोणावरही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
“पंढरीचा वारकरी हा समानतेचे प्रतीक आहे. इथे सर्वच भाविक विठ्ठलाचे लेकरू आहेत. त्यामुळे दर्शनाच्या बाबतीतही समानता असलीच पाहिजे.” या निर्णयाचे भाविक आणि वारकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास ठेवू नये. दर्शनासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत. कोणताही दलाल आढळल्यास त्वरित प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आला आहे .
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

पेरणी केलात, पाऊस नाही. तर ३१ जुलैपर्यंत पीकविमा भरा

Next Post

मंडल अधिकार्‍याला लखपती होण्याचा मोह नडला,

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी पैशाची मागणी

मंडल अधिकार्‍याला लखपती होण्याचा मोह नडला,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135185

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697