Friday, July 31, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पेरणी केलात, पाऊस नाही. तर ३१ जुलैपर्यंत पीकविमा भरा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 13, 2026
in सोलापूर
0
पेरणी केलात, पाऊस नाही. तर ३१ जुलैपर्यंत पीकविमा भरा
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 कृषी विभागाकडून पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन

सोलापूर : खरीप हंगाम २०२६-२७ साठी सोलापूर जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. अधिसूचित महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकाचे चालू वर्षातील सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत असून, शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केला आहे.


पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकरी हिस्सा (प्रति हेक्टर)
– बाजरी : विमा संरक्षित रक्कम ₹२७,००० – शेतकरी हिस्सा ₹१३५
– मुग व उडीद : विमा संरक्षित रक्कम ₹२७,००० – शेतकरी हिस्सा ₹५४०
– तूर : विमा संरक्षित रक्कम ₹४२,००० – शेतकरी हिस्सा ₹४२०
-मका : विमा संरक्षित रक्कम ₹४०,००० – शेतकरी हिस्सा ₹१००
– भुईमूग : विमा संरक्षित रक्कम ₹४२,००० – शेतकरी हिस्सा ₹८४०
– सोयाबीन : विमा संरक्षित रक्कम ₹५८,००० – शेतकरी हिस्सा ₹१,१६०
– कांदा : विमा संरक्षित रक्कम ₹७५,००० – शेतकरी हिस्सा ₹३,७५०
शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल (NCIP) वर ऑनलाइन नोंदणी करता येईल. बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा स्वतः ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून योजनेत सहभागी होता येईल.


१. अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी बंधनकारक.
२. जमिनीची ७/१२, ८-अ, पीक लागवड घोषणापत्र.
३. आधार क्रमांक व आधारशी संलग्न बँक खाते.
४. डिजिटल क्रॉप सर्व्हे करणे बंधनकारक – डिजिटल क्रॉप सर्व्हेमधील पीक व विम्यासाठी नमूद केलेले पीक यामध्ये तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्व्हेमधील नोंद अंतिम मानली जाईल व अर्ज रद्द होईल.
५. योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान ०.१० हेक्टर क्षेत्र अधिसूचित पिकाखाली असणे आवश्यक.
चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा गैरमार्गाने अर्ज करून लाभ घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे कृषी विभागाच्या विविध योजनांपासून वंचित ठेवण्यात येईल.
योजनेसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा १४४४७ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
….
चौकट
…..
हवामान विभागाने यंदाच्या हंगामात व्यक्त केलेल्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आर्थिक संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केला आहे.

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

पंढरपुरात ” चार हजार” सायकल स्वारांची दिंडी

Next Post

विठ्ठल दर्शनासाठी आता “नो वशिला” , “सगळ्यांसाठी एकच रांग, एकच नियम!” ,

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विठ्ठल दर्शनासाठी आता “नो वशिला” ,   “सगळ्यांसाठी एकच रांग, एकच नियम!”       ,

विठ्ठल दर्शनासाठी आता "नो वशिला" , "सगळ्यांसाठी एकच रांग, एकच नियम!" ,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा , सफाई कामगाराचा मुलगा बनला कुस्ती कोच

मद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा , सफाई कामगाराचा मुलगा बनला कुस्ती कोच

July 30, 2026
लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

July 23, 2026
ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

July 23, 2026
१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

July 23, 2026
सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

July 23, 2026
‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

July 22, 2026
चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

July 21, 2026
वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

July 21, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक