राज्यासह कर्नाटकातून निघालेली सायकल दिंडी पंढरपुरात
पंढरपूर :- आषाढी एकादशी सोहळा 25 जुलै रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अनेक दिंड्या व पालखी सोहळ्यासोबत आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूरकडे येत आहेत. अशातच महाराष्ट्र व कर्नाटकातून चार हजार सायकल्सची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे. पंढरपुरात आज सायकल संमेलन पार पडले. यावेळी सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकल वरून नगरप्रदक्षणा केली. भारतीय क्रीडा प्राधिकरणचे संचालक पांडुरंग चाटे व आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सायकल दिंडीचे उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला.

फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत या दिंडीमध्ये सायकल सारख्या व्यायामाचे महत्व पटवून देण्यात आले. नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते, असा संदेश या वेळी देण्यात
यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी हरीष बैजल, यांच्यासह पंढरपूर सायकल्स क्लब व नाशिक सायकल क्लब आणि बारामती सायकल क्लब यांनी उत्तम प्रकारचे नियोजन केले होते.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









