Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘तांत्रिक कारण’ ठरणार औरादच्या “सर्कल”साठी डोकेदुखी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 14, 2026
in सोलापूर
0
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 29;

0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रद्द झालेल्या नोंदींची होणार तपासणी

दक्षिण सोलापूर ….
औरादचे सर्कल मेहमूदपाशा सरकाझी यांच्या कारकिर्दीत रद्द झालेल्या नोंदींची तपासणी करण्याचे आदेश मंद्रूपचे तहसीलदार विष्णू बुटे यांनी दिली आहे. सर्कल सरकाझी यांनी ‘तांत्रिक कारण’ सांगून शेत व प्लॉट खरेदी केलेल्या अनेक खातेधारकांची नोंद रद्द केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व मंद्रूपचे तहसीलदार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तहसीलदार बुटे यांनी औरादचे सर्कल सरकाझी यांच्या काळातील तांत्रिक कारणामुळे रद्द झालेल्या नोंदींची तफासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तांत्रिक कारणामुळे रद्द झालेल्या नोंदी औरादचे सर्कल सरकाझी यांच्यासाठी “डोकेदुखी” ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे .
सर्कल मेहमूद पाशा सरकाझी यांनी औरादचा पदभार घेतल्यापासून शेती व प्लॉट नोंदी बद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या . अनेक खरेदीदारांनी नोंद रद्द झाल्यामुळे तहसीलदार , उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली . मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे सर्कल यांच्या कारभाराची चौकशी करण्यात आली नव्हती. नोंदी रद्द झाल्यामुळे जिल्हाधिकारी व मंद्रूपचे तहसीलदार यांना निवेदन देऊन व तक्रार करून आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर तहसीलदार बुटे यांनी मंद्रूपच्या नायब तहसीलदार अश्विनी दराडे यांना तांत्रिक कारणामुळे रद्द झालेल्या नोंदी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आलेली नोंद औरादचे सर्कल सरकाझी यांच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे .

       यापूर्वी त्यांच्या कामकाजाबाबत अनेक शेतकरी व खातेधारकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नोंदी रद्द झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सर्कल सरकाझी यांच्यासाठी मात्र हा आदेश त्रासदायक ठरणार आहे . औराद सर्कल मधील राजूर व बंकलगीच्या शिवारातील अवैद्य मुरुम उपसा प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच तांत्रिक कारणामुळे रद्द झालेल्या नोंदींचे चौकशीचे आदेश दिल्यामुळे महसुल विभागात जोरदार चर्चा सुरू आहे.


….
नोंदीविषयी तक्रारी
…
औरादचे सर्कल सरकाझी यांच्या काळातील शेत व प्लाॅट खरेदी नोंदीविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. तांत्रिक कारणामुळे नोंद रद्द करताना त्याचा पुरावा जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या नोंदींची नायब तहसीलदार यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विष्णु बुटे, तहसीलदार, मंद्रूप
….
तपासणीचे आदेश
….
औराद सर्कलमधील शेती व प्लाॅट खरेदी नोंद रद्द बाबत मंद्रूपच्या तहसीलदारांनी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्कल सरकाझी यांना सूचना देण्यात आली आहे. दप्तर तपासणी केल्यानंतर तांत्रिक कारणामुळे रद्द झालेल्या नोंदीविषयी स्पष्टीकरण देता येईल.

अश्विनी दराडे, नायब तहसीलदार, मंद्रूप
______________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

मंडल अधिकार्‍याला लखपती होण्याचा मोह नडला,

Next Post

“एकतर शाळा पूर्ण ताकदीने चालवा, नाहीतर खाजगी शिकवण्याना मान्यता द्या” आमदार बच्चू कडू

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“एकतर शाळा पूर्ण ताकदीने चालवा, नाहीतर खाजगी शिकवण्याना मान्यता द्या” आमदार बच्चू कडू

"एकतर शाळा पूर्ण ताकदीने चालवा, नाहीतर खाजगी शिकवण्याना मान्यता द्या" आमदार बच्चू कडू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133966

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697