Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“एकतर शाळा पूर्ण ताकदीने चालवा, नाहीतर खाजगी शिकवण्याना मान्यता द्या” आमदार बच्चू कडू

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 18, 2026
in सोलापूर
0
“एकतर शाळा पूर्ण ताकदीने चालवा, नाहीतर खाजगी शिकवण्याना मान्यता द्या” आमदार बच्चू कडू
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘ राज्यातील  विद्यार्थ्यांची लूट थांबवा’

सोलापूर :
 राज्यातील खाजगी ट्युशन्स (कोचिंग क्लासेस) आणि अधिकृत शाळा यांच्यातील वाढत्या वादावर आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला आणि शिक्षणमंत्र्यांना धारेवर धरले. “राज्यात विद्यार्थ्यांची लूट थांबवायची असेल तर सरकारने एक स्पष्ट धोरण आखण्याची गरज आहे,” असे आमदार बच्चू कडू यांनी सभागृहात  सांगितले. 
विद्यार्थी शाळेत न जाता थेट कोचिंग क्लासेसला प्राधान्य देत असल्याने शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरकारला उद्देशून आमदार कडू म्हणाले, “एकतर अधिकृत शाळा पूर्ण ताकदीने चालवा, नाहीतर त्या बंद करून खाजगी शिकवण्यांनाच मान्यता द्या; ही दुटप्पी भूमिका थांबली पाहिजे.” अनेक टयुशनचालक पालक व विद्यार्थ्यांकडून भयनसाठ फि वसूल करून लूट करीत आहेत. याबाबत अनेक वेळा शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे खासगी टयुशन घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून आमदार बच्चू कडू यांनी
 खाजगी ट्युशन्स चालकांकडून अवाढव्य फी वसूल केली जात असून, सर्वसामान्य पालकांचे कंबरडे मोडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील ‘डमी शाळा’ आणि बेकायदेशीर कोचिंग क्लासेसवर तातडीने ट्युशनबंदी किंवा कडक नियमावली लागू करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार बच्चू कडू यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात यावर स्पष्टीकरण दिले. शिक्षण व्यवस्थेचे बाजारीकरण रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, शाळांना दांडी मारून कोचिंग क्लासेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि  खाजगी शिकवण्यांवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच  कडक नियमावली आणली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

‘तांत्रिक कारण’ ठरणार औरादच्या “सर्कल”साठी डोकेदुखी

Next Post

जिल्ह्यात ‘श्री संत गजानन महाराज पालखी’चे उत्साहात स्वागत

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जिल्ह्यात ‘श्री संत गजानन महाराज पालखी’चे उत्साहात स्वागत

जिल्ह्यात 'श्री संत गजानन महाराज पालखी'चे उत्साहात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133966

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697