Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

जिल्ह्यात ‘श्री संत गजानन महाराज पालखी’चे उत्साहात स्वागत

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 18, 2026
in सोलापूर
0
जिल्ह्यात ‘श्री संत गजानन महाराज पालखी’चे उत्साहात स्वागत
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा’ जयघोषात पालखी मार्गस्थ

सोलापूर: श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना, श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीने शुक्रवारी धाराशिव जिल्हा हद्दीतून तामलवाडीच्या पुढे उळे कासेगाव सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे पारंपरिक पद्धतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी सनी चव्हाण, दक्षिण सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलम घोगरे, जिल्हा परीषद सदस्य नेताजी खंडागळे, पंचायत समिती दक्षिण सोलापूरचे सभापती संदीप टेळे , उपसभापती वर्षा पटणे तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेऊन वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


आषाढी वारीसाठी राज्यभरातून पंढरपूरकडे मानाच्या दहा पालख्यांसह शेकडो दिंड्या येत असतात. श्री संत गजानन महाराजांची पालखी विदर्भातून निघून सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. सहभागी वारकरी ‘विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा’ असा जयघोष करत, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भजन-कीर्तन करत आनंदाने पुढे मार्गस्थ होत होते. अबालवृद्ध वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पंढरीच्या दिशेने चालण्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. जिल्हा प्रशासनाने पालखी मार्गावर भाविकांसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहे आणि सुरक्षिततेची चोख व्यवस्था केली आहे. पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस बंदोबस्त, आरोग्य पथके आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. आज श्री गजानन महाराजांची पालखी पुढील मुक्काम उळे येथे करून आज शनिवारी सोलापूर शहरात प्रवेश करणार आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

“एकतर शाळा पूर्ण ताकदीने चालवा, नाहीतर खाजगी शिकवण्याना मान्यता द्या” आमदार बच्चू कडू

Next Post

समाजाच्या विकासासाठी सदैव सहकार्य . सेवानिवृत्त अधिकार्‍यांची ग्वाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
समाजाच्या विकासासाठी सदैव सहकार्य . सेवानिवृत्त अधिकार्‍यांची ग्वाही

समाजाच्या विकासासाठी सदैव सहकार्य . सेवानिवृत्त अधिकार्‍यांची ग्वाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133966

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697