Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 22, 2026
in सोलापूर
0
‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन

पंढरपूर : “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दसूर पाटी येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेताना घातले. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे काही वेळ सारथ्यही केले. वारीत चालणारे सर्व वारकरी हे माऊलीचे जिवंत स्वरूप असल्याने वारीत चालण्याचा आनंद व्यक्त करतांना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, माऊलीकडे एकच मागणं आहे ते म्हणजे सर्वत्र पाऊस चांगला पडू दे व शेतकरी बांधवांना सुखी समाधानी राहू दे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात मागील दोन वर्षांपासून पालखीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा शासन उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे यावर्षीच्या वारीला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक येत असून मागील सर्व वाऱ्यांचा संख्यात्मक विक्रम तुटेल.


जिल्हा प्रशासनाकडून वारीमध्ये उत्तम सुविधा करण्यात आल्या आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांची संख्या ही मोजली जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी चांगले काम केले आहेत.  जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन घेण्याचा योग आला हे माझे मोठे भाग्य आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार अभिजीत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते.

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

Next Post

सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133947

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697