Tuesday, July 28, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 23, 2026
in सोलापूर
0
ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ओबीसी समाजातील पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर : इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत १३ उपकंपन्यांचे जिल्हास्तरीय कामकाज सोलापूर येथे सुरू करण्यात आले आहे. या महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती वृषाली लहारे यांनी केली आहे.
महामंडळांतर्गत  १३ समाजांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळे कार्यरत आहेत— जग्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत वाणी), संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज), संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (न्हावी समाज), लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ (लेवा समाज), सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशाखीय वाणी/वाणी समाज), स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ (लोणारी समाज), संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ (शिंपी समाज), संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ (सुतार समाज), सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ (गुजर समाज), संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज), संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज), संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज) आणि आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ (आगरी समाज).


महामंडळामार्फत सहा योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. यामध्ये थेट कर्ज योजना (१ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी), २० टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना यांचा समावेश आहे.
या योजनांसाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह http://www.msobcfdc.org  या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, सात रस्ता, सोलापूर – ४१३००३, दूरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२५९५ येथे संपर्क साधावा.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

Next Post

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

July 23, 2026
ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

July 23, 2026
१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

July 23, 2026
सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

July 23, 2026
‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

July 22, 2026
चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

July 21, 2026
वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

July 21, 2026
वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन

वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन

July 21, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक