Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 23, 2026
in सोलापूर
0
लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वारवरी मुक्कामी पालखी सोहळा विसावला

पंढरपूर ः -श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) येथे लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडले. माउलींच्या पालखी सोहळ्यातील चौथे आणि शेवटचे गोल रिंगण आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ उत्साहात पार पडले.रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकरी आनंदाने विठुनामाच्या जयघोषात तल्लीन झाले होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यातील विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या गुरुवारी वाखरीत दाखल झाल्या. दरम्यान, दुपारी भंडीशेगाव येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने निघाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उभ्या रिंगणासाठी बाजीराव विहिरीसमोर आला. उड्डाणपुलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यालगत लागलेले रिंगण पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दुपारी साडेतीन वाजता उभे रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर माऊलीचा सोहळा गोल रिंगणासाठी सायंकाळी ५.३० वाजता माऊलींचा सोहळा रिंगणस्थळी आला. यानंतर सेवेकऱ्यांनी टाळ-मृदंगांच्या तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या भोवतीने रिंगण घातले.मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वस्वार रिंगणाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी माऊली. माऊलीचा गजर केला.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील दुसरे उभे रिंगण, तर चौथे गोल रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले. यानंतर पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर असलेल्या वाखरी पालखी तळ येथे विसावला.

_________________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

Next Post

मद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा , सफाई कामगाराचा मुलगा बनला कुस्ती कोच

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा , सफाई कामगाराचा मुलगा बनला कुस्ती कोच

मद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा , सफाई कामगाराचा मुलगा बनला कुस्ती कोच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133947

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697