Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

समाधान शिबिर की गैरसोय शिबिर ? मंद्रूपच्या शिबिरावर नागरीकांची नाराजी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 1, 2026
in सोलापूर
0
समाधान शिबिर की गैरसोय शिबिर ? मंद्रूपच्या शिबिरावर नागरीकांची नाराजी
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंद्रूपमध्ये लाभार्थ्यांपेक्षा अधिकाऱ्यांची गर्दी,

आमदार देशमुख यांनी अधिकार्‍यांना सुनावले

 दक्षिण सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मंद्रूप येथे आयोजित करण्यात आलेल्या “समाधान शिबिरा”चे आयोजन म्हणजे केवळ फोटोसेशन आणि देखावा होता का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. अप्पर तहसील कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे हे शिबिर पूर्णपणे फसले असून लाभार्थ्यांपेक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे चित्र दिसले. शिबिरामध्ये नागरीकांची कामे मार्गी न लागल्याने नागरीकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या शिबिराचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंद्रूपच्या जिल्हा परिषद सदस्या सोनाली कडते, उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार विष्णु बुटे, सरपंच अनिता कोरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
“अधिकाऱ्यांनी कार्यालयातच नागरिकांची कामे प्रामाणिकपणे केल्यास अशा शिबिरांची गरजच भासणार नाही. पण कार्यालयात दलालांमार्फत कामे होतात आणि नागरिकांची लूट होते. अशा दलालांची नावासह माहीती उपलब्ध आहे. ती जाहीरपणे सांगण्याची तयारी आहे. प्रत्येक ग्रामसेवक व तलाठीने मुख्यालयात राहून वेळेत सेवा द्यावी, अन्यथा कारवाई केली जाईल” असा थेट इशारा आमदार देशमुख यांनी दिला. मंद्रूप परिसरात सुरू असलेल्या मुरूम, वाळूच्या अवैध उपशाकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याने शासनाचे कोट्यावधींचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकाच स्टॉलमध्ये अनेक विभाग :

…
तहसीलदारांच्या नियोजनाअभावी कृषी विभागासारख्या महत्वाच्या विभागाला स्वतंत्र स्टॉलच मिळाला नाही. आशा वर्करच्या स्टॉलमध्ये भूमापन कार्यालयाचे अधिकारी बसले होते. तर महसूलच्या एकाच स्टॉलमध्ये 5-6 विभाग कोंबल्याने प्रचंड गोंधळ उडाला.
….
महत्वाच्या विभागांची गैरहजेरी
:
शिक्षण, पोलीस, आरटीओ, वीज, बँक यासह अनेक विभागांचे अधिकारी शिबिराला फिरकलेच नाहीत. त्यामुळे नागरिक हताश झाले. कर्जमाफीसारख्या विषयांची माहीती मिळू शकले नाही.
..,
अधिकाऱ्यांचीच गर्दी :
…
तहसीलदार विष्णू बुटे यांनी गर्दी दाखवण्यासाठी सर्वांना उपस्थिती बंधनकारक केली होती. त्यामुळे सर्कल, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कोतवाल यांची गर्दी होती. पण खरा लाभार्थी दिसत नव्हता.
…
दुपारपर्यंतच शिबिर बंद
..
शिबिराची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 अशी असताना दुपारी 1.30 ते 2 वाजताच सर्व स्टॉल बंद झाले. त्यामुळे शेतीकामे व मजुरी करून आलेल्या नागरिकांना हात हलवत परत जावे लागले.
…
लाभार्थ्यांची लूट
…
आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, पुरवठा विभागाच्या स्टॉलसमोर गर्दी होती. पण नियंत्रण नसल्याने काही ठिकाणी लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आहेत.
..
मुलभूत सुविधांचा अभाव
…
नागरिकांसाठी बसण्याची व अल्पोपहाराची सोय नव्हती. दिव्यांगांसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. कमी जागेत स्टॉल असल्याने काम करणेही कठीण झाले.
.,,,
तहसीलदारांवर टीका
…,
शासनाच्या आदेशानुसार शिबिर घ्यायचे होते. पण तहसीलदार विष्णू बुटे यांच्या हलगर्जीपणामुळे जनजागृती झाली नाही. त्यामुळे नागरिकांनाच माहिती मिळाली नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
…
एकंदरीत “समाधान” देण्यासाठी आलेले हे शिबिर नागरिकांसाठी “गैरसोयीचे शिबिर” ठरले. अनेक विभागाकडून यापूर्वी करण्यात आलेले प्रमाणपत्र व साहीत्य वाटप करण्यात आले . यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

अधिकार्‍यांच्या दलालांची नावे जाहीरपणे सांगू का ? आमदार देशमुख यांचा इशारा

Next Post

वाहनधारकांनो सावधान ! पुन्हा एचएसआरपी कारवाई सुरू

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
वाहनधारकांनो सावधान ! पुन्हा एचएसआरपी कारवाई सुरू

वाहनधारकांनो सावधान ! पुन्हा एचएसआरपी कारवाई सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133920

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697