‘मदार’ चित्रपटाचे मोफत शो द्वारे विद्यार्थ्यांसमोर ठेवला आदर्श
सोलापूर..
दक्षिण पंचायत समितीचे बीडीओ व करमाळा तालुक्यातील घोटी गावचे सुपूत्र मनोज राऊत यांनी शाळेच्या मुलांमध्ये संघर्ष करण्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी ‘मदार’ चित्रपटाचा आधार घेतला आहे. घोटी येथील विद्यार्थ्यांसाठी घोटी गावचे सुपुत्र व दिग्दर्शक मंगेश बदर यांच्या ‘मदार’ चित्रपट चांदगुडे सिनेमा करमाळा येथे मोफत शो चे आयोजन करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये संघर्ष गुण वाढविण्यासाठी भूमिपूत्राच्या सिनेमाचे आयोजन करून संधी दिली आहे. यापूर्वी बीडीओ राऊत यांनी करमाळा तालुका व घोटी परीसराच्या विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ग्रामिण भागाशी नाळ जुळवून ठेवली आहे.
‘मदार’ हा ग्रामीण भागातील वास्तव मांडणारा आणि पाण्याच्या प्रश्नावर प्रभावी भाष्य करणारा चित्रपट आहे. दुष्काळाच्या भीषण संकटात गावातील लोकांनी स्थलांतर करू नये व गाव एकजुटीने उभे राहावे आणि पाण्यासाठी सामूहिक संघर्ष करावा यासाठी एक प्राध्यापक अथक प्रयत्न करतो.
“पाणी हेच जीवन आहे” हा अत्यंत महत्त्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतो. पाण्याचे संवर्धन, त्याचे महत्त्व आणि त्यासाठी प्रत्येकाने सातत्याने संघर्ष करण्याची गरज याची जाणीव हा चित्रपट प्रभावीपणे करून देतो.
ग्रामीण जीवन, मानवी नाती, संघर्ष आणि आशेचा प्रवास अनुभवण्यासाठी ‘मदार’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाला पुणे आंतरराष्र्टीय चित्रपट महोत्सवात पाच पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय फ्रान्स येथील कान्स आंतरराष्र्टीय चित्रपट महोत्सवात कौतुकाचा विषय ठरलेला आहे.

भविष्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी व आजच्या लहान पिढीला सक्षम आणि सजग बनवणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धन, पाण्याची बचत, वृक्षारोपण आणि नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर याविषयी त्यांना योग्य मार्गदर्शन करणेही तितकेच आवश्यक आहे. ‘मदार’ हा चित्रपट याच विचाराला अधोरेखित करतो. पाणी हे केवळ जीवन नसून आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. त्याचे संवर्धन केले तरच भविष्यातील नैसर्गिक संकटांची तीव्रता कमी करता येईल. समाजात जागृती निर्माण करणारा, संघर्षाची प्रेरणा देणारा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ‘मदार’ हा चित्रपट असल्याचे घोटी गावचे सुपुत्र व दिग्दर्शक मंगेश बदर यांनी सांगितले.
…,,
मुलांसमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न
…
आजच्या मोबाइल व स्पर्धेच्या युगात मुलांमध्ये संघर्ष करण्याची क्षमता कमी होत आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी व आजच्या पिढीला सक्षम आणि सजग बनवून पर्यावरणाचे संवर्धन, पाण्याची बचत, वृक्षारोपण आणि नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्यासाठी मुलांमध्ये जबाबदारी गुण वाढावे . त्यासाठी विविध मार्गाने योग्य मार्गदर्शन करणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे घोटी गावात ‘मदार’ या चित्रपटाचे मोफत शो ठेऊन मुलांसमोर आदर्श ठेवला आहे.
मनोज राऊत, बीडीओ, दक्षिण सोलापूर
…
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













