सोलापूर जिल्हा समाज कल्याण कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह
सोलापूर:
जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सोलापूर येथील कनिष्ठ लिपिक मल्लिकार्जुन मळगे यांच्या कार्यपद्धतीवर आणि कार्यालयातील एकूणच कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विविध स्तरांतून होत असलेले आरोप आणि तक्रारी पाहता, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वसतिगृहांशी संबंधित विविध प्रस्ताव, मंजुरी, तपासणी आणि इतर प्रशासकीय कामे कथितपणे आर्थिक व्यवहारांच्या आधारे केली जात असल्याची चर्चा सुरू असून वसतिगृहांना प्रत्यक्ष भेट न देता किंवा विद्यार्थ्यांच्या आवश्यक उपस्थितीची पडताळणी न करताच फाईलींवर स्वाक्षऱ्या आणि कार्यवाही होत आहे. या आरोपांमुळे समाज कल्याण विभागाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
संबंधित लिपिकाविरोधात यापूर्वीही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी तक्रारी केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, “त्या तक्रारींवर नेमकी काय कारवाई झाली?”, “त्यांचा निकाल काय लागला?” याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच्या तक्रारींची पारदर्शक माहिती जाहीर करावी, अशी मागणी नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
…
नियमबाह्य कार्यभाराचा संशय
…,
या प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे ते म्हणजे कार्यभाराच्या नियमांचे. संबंधित कर्मचारी हे प्रशासकीय लिपिक असताना, त्यांच्याकडे लेखा (Accounts) विभागाचा कार्यभार कोणत्या प्रशासकीय आदेशानुसार सोपवण्यात आला? तसेच स्टेट कार्यालयाशी संबंधित व्यक्तीची जिल्हा परिषद सोलापूर येथे नेमणूक किंवा कार्यभार कोणत्या नियमांनुसार दिला गेला ? याचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
…
दुजाभाव आणि भ्रष्टाचाराचे आरोप
…..
कार्यालयात काही मोजक्या वस्तीगृह चालकांची कामे प्राधान्याने आणि ‘कमी खर्चात’ केली जातात, तर इतरांकडून आर्थिक मागण्या केल्या जात असल्याचा चर्चा सुरु आहे. या प्रकरणात काही वरिष्ठ अधिकारीही सामील असल्याची चर्चा सुरू आहे.
….
या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष समाज कल्याण सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), जिल्हा परिषद सोलापूर आणि संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे लागले आहे. या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणले जाईल का ? आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई होणार का ? याकडे लक्ष लागले आहे.
______________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













