कासेगाव येथील समाधान शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जन्मदिवस व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत समाधान शिबिर कासेगाव येथे आयोजित करण्यात आले होते . अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध महसुली सेवा, दाखले, प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध करून देण्यात आला. महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. तसेच विविध दाखले, प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचा लाभ, महसुली सेवा आणि इतर आवश्यक सुविधांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत त्यांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी नगरसेवक अनंत जाधव, उपविभागीय अधिकारी सोलापूर सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, कासेगाव पंचायत समिती सदस्य विजय राठोड, सरपंच यशपाल वाडकर, सोमनाथ पटणे, पं. स. गटनेता बलवान गोतसुर्वे, पं. स. सदस्य मळसिद्ध मुगळे, होटगी पं. स. सदस्य अंबिकाताई पाटील, गंगेवाडी सरपंच प्रशांत जाधव, राज साळुंखे, दशरथ कोळी, उपसरपंच , शहाजन शेख, शंकर येणगुरे, मधुकर चिवरे, नाना भोसले, मनोज गुंड, प्रवीण चौगुले, दत्ता डांगे, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरीक संख्येने उपस्थित होते.
…..
दाखले वाटप
…,
हयात दाखले 257
रेशन कार्ड युनिट वाढ 240
रेशनकार्ड युनिट कमी 125
नवीन शिधापत्रिका 10
संजय गांधी योजना 17
उत्पन्न दाखले 96
वय राष्ट्रीय अधिवास दाखले 02
जातीचे दाखले 13
नॉन क्रिमिलियर 10
EWS प्रमाणपत्र 18
7/12 उतारा वाटप 62
7/12 दुरुस्ती 1 , 8 अ वाटप 45
आधार कार्ड 164
पशुवैद्यकीय 20
कृषी विभाग 60
आरोग्य विभाग 146
महिला व बालकल्याण विभाग
1. बेबी केअर किट 3
2. लेक लाडकी योजना 2
3. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 7
4. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 23
5. माझी कन्या भाग्यश्री योजना 1 (FD रक्कम 25000/-)
एकूण = 1323
_____________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













