Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शेतकर्‍यांना परदेश अभ्यास दौर्‍याची संधी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 2, 2026
in सोलापूर
0
शेतकर्‍यांना परदेश अभ्यास दौर्‍याची संधी
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परदेश अभ्यास दौर्‍यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादनाची गुणवत्ता सुधारणा आणि जागतिक स्तरावरील कृषी पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाच्या राज्यपुरस्कृत योजनांतर्गत शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी अभ्यास दौऱ्यासाठी युरोप आणि चीन या देशांची निवड करण्यात आली आहे.


या योजनेअंतर्गत लाभ घेणारा अर्जदार स्वतः शेतकरी असणे,  ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे, शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असणे, वैध पासपोर्टधारक असणे तसेच शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करताना पासपोर्टची किमान एक वर्ष वैधता असणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी अथवा खासगी संस्थेत नोकरी करणारा नसावा तसेच डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, अभियंता, कंत्राटदार आदी व्यवसायातील नसावा.
शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा कमाल दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यास पाच शेतकऱ्यांची मर्यादा देण्यात आला असून त्यामध्ये एक महिला शेतकरी तसेच केंद्र किंवा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारप्राप्त अथवा पीक स्पर्धा विजेत्या एका शेतकऱ्याची निवड करणे अनिवार्य आहे. अर्जांची संख्या लक्षांकापेक्षा जास्त असल्यास जिल्हास्तरीय समितीसमोर सोडत काढून ज्येष्ठता क्रमवारीनुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी दि. १७ ऑगस्टपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत.अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४.०० वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे उपस्थित राहावे. प्राप्त अर्जांची जिल्हास्तरीय समितीसमोर सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधव व भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

कासेगाव शिबिरावर नागरीक “समाधान” , विविध विभागांच्या १३२३ दाखल्यांचे वाटप

Next Post

मंद्रूपच्या तहसीलदारांकडून चौकशी करण्यास टाळाटाळ

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रूपच्या तहसीलदारांकडून चौकशी करण्यास  टाळाटाळ

मंद्रूपच्या तहसीलदारांकडून चौकशी करण्यास टाळाटाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133920

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697