गोरे कोण आहेत ? हे मला माहीत आहे
सोलापूर :
राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री असणार्या जयकुमार गोरे यांना एका गुन्ह्यात समन्स निघाला आहे. नियमबाह्य कामामुळे मंत्र्यांना समन्स निघणे लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांना जयकुमार गोरे मंत्री म्हणून ठेवण्याची काय मजबूरी हे सांगावे. गोरे यांना काढून भाजपच्या निष्ठावंतांना मंत्रीपदाची संधी द्यावु, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या विरोधातील कथित गुन्ह्यांचा उल्लेख केला. तसेच पालकमंत्री गोरे यांचा दुसरा एपिसोड लवकरच जाहीर करणार असून ते भाजपमध्ये का दाखल झाले ? हे स्पष्ट करण्याचे आवाहन सुषमा अंधारे यांनी केला. सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री गोरे यांच्यावर हल्लाबोल करुन ‘गोरे कोण आहेत? हे मला चांगलंच माहिती आहे. त्यांच्यावर 19 गुन्हे दाखल आहेत. 19 गुन्हे दाखल असतानाही गोरे मंत्री कसे झाले ? एखाद्यावर 4 ते 5 गुन्हे दाखल झाले, तर त्यांच्यावर मोक्का दाखल होतो. मोक्काची कारवाई टाळण्यासाठी गोरे भाजपमध्ये दाखल झाले आहेत का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, पालकमंत्री गोरे यांनी कारण नसताना काही विधाने केली. त्यामुळे ‘बालकमंत्री’ गोरे यांना त्याच भाषेत बोलण्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रयत्न केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, मृत व्यक्तीला जिवंत दाखवत एका दलित माणसाची जागा नावावर करून घेतली. त्यांच्यावर 6 मार्च 2025 रोजी ऍट्रॉसिटी दाखल झाली आहे. तसेच, 8 मे 2026 रोजी ‘नॉन बेलेबल वॉरंट’ जाहीर झाला आहे . समन्स रद्द होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या सगळ्यावर गोरे कधी बोलणार आहेत का ? कोविड काळात बोगस बिल दाखल करून ४ ते ५ कोटी निधी संस्थेला मिळवून दिल्याचा दावाही अंधारे यांनी केला .
बनावट कागदपत्रांच्या कथित वापराचे प्रकरण, कोविड काळातील सरकारी आरोग्य योजनेतील आर्थिक गैरव्यवहार आणि चार्जशीटच्या तपासावर उपस्थित झालेले प्रश्न या सर्व मुद्द्यांमुळे जयकुमार गोरे यांच्याविरोधातील प्रकरणांवर राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली असून, आता या गंभीर आरोपांवर संबंधितांकडून काय उत्तर दिले जाते ? याकडे राजकीय वर्तुळासह जनतेचे लक्ष लागले आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













