Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, पंचायत समितीकडून खबरदारी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 15, 2026
in सोलापूर
0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, पंचायत समितीकडून खबरदारी
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बबलाद शाळा दुर्घटना पार्श्वभुमीवर दक्षिण पंचायत समितीकडून मुख्याद्यापकांना सूचना

सोलापूर…
सध्या पावसाळा सूरु असल्याने धोकादायक वर्गखोल्यांमुळे मुलांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकते म्हणून मुख्याद्यापकांनी धोकादायक वर्गखोल्यांची माहीती त्वरीत प्रशासनाला कळविण्याचे आवाहन दक्षिणचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले आहे. अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील शाळा दुर्घटना पार्श्वभूमीवर दक्षिण पंचायत समितीने खबरदारी म्हणून शाळा मुख्याध्यापकांना पत्राव्दारे कळविण्यात आली आहे. धोकादायक खोल्यांमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका होणार नाही तसेच शिक्षणावर परीणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश बीडीओ राऊत यांनी दिले आहे.


अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या स्लाबचा भाग कोसळून १२ विद्यार्थी जखमी झाले होते. म्हणून दक्षिण पंचायत समितीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन शाळेतील धोकादायक वर्गखोल्यांची माहीती प्रशासनाला कळविण्याचे आवाहन केले आहे. तसेच धोकादायक खोल्या असणार्‍या वर्गातील मुलांची सोय अंगणवाडी व अन्य सार्वजनिक ठिकाणी करण्यास सांगितले आहे. सर्व मुख्याद्यापकांनी धोकादायक वर्गखोल्यांची माहीती दिल्यानंतर त्वरीत स्र्टक्चरल आॅडीट करून जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले .
…
दक्षिण तालुक्यात अनेक गावात जुन्या व जीर्ण झालेल्या शाळांच्या वर्गखोल्या आहेत. पावसामुळे त्या वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दक्षिण पंचायत समीतीकडून मुख्याद्यापकांना धोकादायक वर्गखोल्यांची माहीती देण्यास सांगण्यात आली आहे. माहीती मिळाल्यानंतर पालकमंत्री व जिल्हा परिषद प्रशासनाकडे नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी पाठपुरावा करणार आहे.

संदिप टेळे, सभापती,
पंचायत समिती, दक्षिण सोलापूर.
….

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जुन्या व कालबाह्य वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकते. म्हणून प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व मुख्याद्यापकांना धोकादायक वर्गखोल्यांची माहीती देण्याचे आदेश देण्यात आले आहे. सध्या हत्तूर ४, बंकलगी ५, मनगोळी ३, मद्रे ७ , होनमुर्गी ३ वर्गखोल्या धोकादायक असल्याने त्यांच्या
पाडकामास मंजूरी देण्यात आली आहे. मुख्याद्यापकां कडून माहीती मिळाल्यानंतर धोकादायक वर्गखोल्या पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे.

मनोज राऊत, गटविकास अधिकारी , पंचायत समिती, दक्षिण सोलापूर.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वज विक्रीस बंदी राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे

Next Post

विविध पुरस्कारांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विविध पुरस्कारांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

विविध पुरस्कारांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133841

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697