भीमाशंकर घाटरस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
भीमाशंकर देवस्थानात २ लाखाहून अधिक भाविकांची हजेरी, २ किलोमीटर लांब रांगा
भीमाशंकर (पुणे):
सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे राज्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग सुट्ट्या मिळाल्यामुळे देशातील विविध भागातील लाखो भाविक भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर येथे दर्शनासाठी दाखल झाले आहेत. सलग सुट्ट्यांमुळे मंदिर परिसरात भाविकांचा महापूर आला आहे. पहाटेपासून ५ वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. रविवारी सकाळी दोन लाखाहून अधिक भाविक असल्याने भाविकांना दर्शनासाठी चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

श्रावण महिना आणि जोडीला मान्सूनचा ऋतू असल्याने सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत भाविक भीमाशंकरकडे कूच करत आहेत.
भाविकांची वाढती संख्या आणि गर्दीचे पूर्वनियोजन लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दर्शनाच्या वेळेत बदल केला आहे. श्रावण महिन्यातील गर्दी लक्षात घेता भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून मंदिर आता पहाटे ५:०० ते रात्री ९:३० वाजेपर्यंत सलग खुले ठेवण्यात येत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या पुणे विभागाने शिवाजीनगर, मंचर, नारायणगाव आणि राजगुरुनगर या प्रमुख स्थानकांसह एकूण १२ आगारांतून अतिरिक्त जादा बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत. वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे पार्किंग नंबर ५ च्या पुढे खाजगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून तेथून भाविकांना चालत किंवा स्थानिक वाहनाने जावे लागत आहे. मंदिर परिसरापासून ३ किलोमीटर आधीच सर्व अधिकृत पार्किंग फुल्ल झाल्यामुळे, पोलिसांनी पर्यटकांची वाहने थांबवून भाविकांना पायी किंवा एसटी महामंडळाच्या बसने पुढे पाठवण्याची व्यवस्था यावर तब्बल ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या संथ रांगा लागल्या आहेत. देवस्थान समितीने दर्शनाच्या वेळेत वाढ केली आहे. पूर्वी बांधकाम व दुरुस्तीसाठी मर्यादित वेळेत उघडणारे मंदिर आता श्रावण महिन्यानिमित्त पहाटे ५:०० ते रात्री ९:३० वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात येत आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*












