शाहरूख खान , अजय देवगन व टायगर श्राफ यांना कारणे दाखवा नोटीस
सोलापूर…
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात प्रतिबंधित असलेल्या पान मसाल्याच्या सरोगेट (अप्रत्यक्ष) जाहिराती प्रकरणी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
तिन्ही अभिनेते ‘विमल इलायची’च्या जाहिरातीत एकत्र दिसले होते. ही इलायचीची जाहिरात असली, तरी याद्वारे महाराष्ट्रात बंदी असलेल्या ‘विमल पान मसाला’ या तंबाखूजन्य ब्रँडचाच अप्रत्यक्ष प्रचार केला जात असल्याचा ठपका FDA ने ठेवला आहे .
महाराष्ट्रात १३ जुलै २०२६ च्या सुधारित आदेशानुसार तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा व पान मसाल्याच्या विक्री, साठवणूक आणि वितरणावर पूर्ण बंदी आहे. अशा प्रतिबंधित ब्रँडचे प्रमोशन ग्राहकांची दिशाभूल करणारे ठरते, असे FDA चे म्हणणे आहे . ‘विमल इलायची/पान मसाला’ मोहिमेशी असलेला संबंधित सहभाग अभिनेत्यांनी त्वरित थांबवावा. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आणि वेबसाइटवरून या जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल व्हिडिओ व मजकूर तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, याचे लेखी स्पष्टीकरण देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
जर अभिनेत्यांनी १५ दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर दिले नाही किंवा ते दोषी आढळले, तर त्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. यासोबतच त्यांना पुढील ३ वर्षांपर्यंत कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यास बंदी घातली जाऊ शकते.
तुकाराम मुंढे यांनी नोटीसमध्ये या जाहिरातीसाठी अभिनेत्यांना मिळालेले मानधन, त्यांचे करारपत्र आणि जाहिरात करण्यापूर्वी त्यांनी घेतलेली खबरदारी याविषयीची कागदपत्रेही सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या धडक कारवाईमुळे बॉलिवूड आणि जाहिरात क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*











