लोकमतने घेतली तहसीलदार लिंबारे यांच्या
कार्याची दखल
लोकमत एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरव
सोलापूर..
तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी प्रशासकीय जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. शासकीय योजना, महसूल प्रशासन, नागरिकांच्या विविध समस्या तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी कार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यातील तत्परता, शिस्त, पारदर्शकता आणि जनसेवेची तळमळ याची दखल घेऊन ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स – सांगली’ पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते देऊन गौरव केला आहे .

कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि उल्लेखनीय प्रशासकीय कार्यातून जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी प्रशासकीय कामे करताना नागरीक व शेतकरी यांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक उपक्रम राबवून शासनाच्या योजना यशस्वी केल्या आहेत. तसेच थेट तहसीलदारांना भेटून समस्या सांगण्यासाठी तहसील कार्यालयाचा दरवाजा सदैव खुला ठेवला आहे. शेतकर्यांची रस्ता, नोंद, जमीन वाटप, जन्म, मृत्यू नोंद , महसूल जमा, शेतीमधील अतिक्रम, आपत्ती व्यवस्थापन व शेती नुकसान भरपाई या सर्व क्षेत्रात तहसीलदार लिंबारे यांनी उत्कृष्ट व लोकाभिमुख काम करून शासनाच्या योजना यशस्वी केल्या आहेत. शिवाय प्रशासन व नागरीक यांच्यामध्ये समन्वय साधून तहसीलदार म्हणून नागरीकांची कामे करण्यासाठी प्राधान्य दिले. यापूर्वीही तहसीलदार लिंबारे यांनी दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व मंद्रूप तहसील कार्यालयात उत्कृष्ट काम करून नावलौकीक मिळविला आहे.
सांगलीमधील आष्टा अप्पर तहसीलमध्ये काम करताना तहसीलदार लिंबारे यांनी लोकाभिमुख व उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज केल्याने लोकमतने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*











