सभापती , उपसभापती व पंचायत समिती सदस्यांनी केला सन्मान
दक्षिण सोलापूर…
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे उपक्रमशील गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी दूरदृष्टीने राबविलेले उपक्रमांची दक्षिणच्या लोकप्रतिनिधीनी दखल घेऊन त्यांचा सन्मान केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना व लोकशाहीची समज विकसित करणारा एकदिवसीय प्रतिकात्मक सरपंच व शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी अभिनव प्रयोग, सुव्यवस्थित व प्रेरणादायी शालेय वातावरण निर्मिती करण्यासाठी सुरू केलेला अभिनव व प्रेरणादायी फाईव्ह स्टार शाळा उपक्रमांची दखल घेत पंचायत समितीच्या मासिक सभेत सभापती संदिप टेळे, उपसभापती पटणे तसेच सर्व पंचायत समिती सदस्यांनी गट विकास अधिकारी मनोज राऊत यांचा अभिनंदन करून सत्कार केला.

दक्षिण सोलापूर तालुका बहुभाषिक असल्याने स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना टिकून राहण्यासाठी इंग्रजी सक्तिचे आहे. कन्नड व मराठी भाषांमुळे इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याने बीडीओ मनोज राऊत यांनी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार १५ दिवसातच अनेक शाळांमधील विद्यार्थी इंग्रजीमध्ये बोलण्यास सुरूवात केले. शिवाय बीडीओ राऊत यांनी शिक्षकांना प्रशिक्षण देऊन पाच टप्यात “फाईव्ह स्टार शाळा ” योजना सुरू करून प्रोत्साहन दिले. त्यामुळे अनेक शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने अनेक गावातील मुलांचे इंग्रजी भाषेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. 
एक दिवसीय प्रतिकात्मक सरपंच उपक्रमामुळे तालुक्यातील चार गावांमध्ये विद्यार्थ्यांना एक दिवस सरपंच होण्याचा मान मिळाला. यामुळे नेतृत्व गुण, प्रशासकीय कामाची माहीती , जबाबदारीची भावना व लोकशाहीची समज विकसित झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. दोन्ही उपक्रमात बीडीओ राऊत यांनी उत्कृष्ट कार्य केल्याने दक्षिणमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासास हातभार लागला आहे . म्हणुन बीडीओ राऊत यांचा सत्कार करण्याचा ठराव हत्तूर पंचायत समिती सदस्य पंचप्पा धनशेट्टी यांनी मांडली. त्यानुसार त्यांचा अभिनंदन करून सर्वांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आले.
_______________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*











