Tuesday, June 30, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

या मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ला बसणार अँटी इन्कमबन्सीचा फटका

मोहीते पाटील यांची होणार एंट्री !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 19, 2026
in सोलापूर
0
या मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ला बसणार अँटी इन्कमबन्सीचा फटका
0
SHARES
239
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्र्टवादी काॅंग्रेसची घड्याळाची काटे फिरणार !
सोलापूर..
दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या मंद्रूप जिल्हा परिषद गटाला पूर्वानुभवाचा विचार करता अॅंटी इन्कमबन्सीचा फटका बसणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बालेकिल्ल्यावर आतापर्यंत एकाच घराण्याची सत्ता राहिली आहे. मंद्रूप मतदारसंघात काॅंग्रेसचे गुरुनाथ म्हेत्रे व अप्पासाहेब काळे वगळता २५ वर्षे मंद्रूपमधील कोरे घराण्याची सत्ता राहीली आहे. मात्र आता या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील दुफळीमुळे राष्र्टवादी काॅंग्रेस अजित पवार गटाला फटका बसणार असल्याचे राजकीय जाणकारामधून सांगण्यात येत आहे.
दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस बालेकिल्ला असताना राष्ट्रवादीचे गोपाळराव कोरे यांनी नेहमी मंद्रूप जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादीची पकड मजबूत ठेवली होती. मात्र त्यांच्याबरोबर असणाऱ्या पंचायत समितीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता .  ‘काकां’च्या स्वभावामुळे व सर्वपक्षीय जनसंपर्कामुळे मंद्रूप जिल्हा परिषद गटावर नेहमी राष्ट्रवादीचा घड्याळाचा काटा स्थिर राहीला होता. मात्र गोपाळराव कोरे यांचे निधन झाल्यानंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला पोरका झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांना एकसंध बांधून ठेवणारा नेता या पक्षात राहिला नाही.

हा बालेकिल्ला नेहमी सर्व धर्मीय व बारा बलुतेदारांचा असल्यामुळे राष्र्टवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा व मानणारा वर्ग आहे . मात्र राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यामुळे आणि येथील नेतृत्व राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटामध्ये सक्रिय असल्यामुळे मुस्लिम व मागासवर्गीयांमध्ये नाराजी आहे . वांगी गावातील उमेदवारांना पंचायत समिती गणातून तीन वेळा पराभव पकरावा लागल्याने वांगीमधील मतदारांमध्येही रोष दिसून येत आहे. मंद्रूप ग्रामपंचायतमध्ये तीन वर्षापासून विकास कामे ठप्प असल्यामुळे मंद्रूपकरांमध्ये नाराजी दिसुन येत आहे.
२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्र्टवादीच्या उमेदवारानी अथक प्रयत्नानंतर ९९ मतांनी विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर मतदारसंघातील इतर गावाच्या विकासासाठी निधी व वेळ दिले नसल्यामुळे त्याचीही नाराजी दिसून येत आहे .त्यामुळे या परिसरातील अँटी इन्कम बन्सीच्या फटका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मंद्रूप जिल्हा परिषद अजित पवार गटाच्या ताब्यात ठेवण्यासाठी व अॅंटी इन्कमबन्सीचा फटका टाळण्यासाठी दक्षिणचे कार्यकर्ते दक्षिण सोलापूर राष्ट्रवादीचे निवडणुक सहप्रभारी डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी डॉ. उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांमधून चर्चा होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दक्षिणमध्ये मोहिते पाटलांची एंट्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यासाठी डाॅ. धवलसिंह मोहीते पाटील समर्थक ‘अॅक्टीव्ह‘ झाले असून मंद्रूपमध्ये राष्र्टवादीच्या घड्याळाची काटे पुन्हा फिरविण्यासाठी प्रयत्नशील दिसुन येत आहेत.
अॅंटी इन्कम बन्सीचा विचार करूनच येथील राष्र्टवादीच्या नेत्यांनी भाजप, काॅंग्रेस, शिवसेना शिंदे गट, माजी आमदार दिलीप माने यांच्याशी संपर्क साधून एकत्र व आघाडी करून निवडणूक लढविण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हा धोका टाळण्यासाठी माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील यांना जिल्हा परिषद लढविण्याची विनंती करीत असल्याचे सांगण्यात येते. शिवाय मंद्रूप गणामधून सेफ म्हणून ‘ कोरे ‘ घराण्यातील उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Previous Post

पैलवानांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम

Next Post

लाटेतही ‘हत्तुरें’चा ‘वैभव’ ठरला प्रभाग २५ चा ‘ब्रॅंड’

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
लाटेतही ‘हत्तुरें’चा ‘वैभव’ ठरला प्रभाग २५ चा ‘ब्रॅंड’

लाटेतही 'हत्तुरें'चा 'वैभव' ठरला प्रभाग २५ चा 'ब्रॅंड'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

June 30, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

June 29, 2026
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक